शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांच्या मारहाणीत एसटीचालकाचा मृत्यू

By admin | Updated: February 10, 2017 05:16 IST

भिवंडी आगारात बस नेताना धक्का लागल्याने मुजोर रिक्षाचालकांनी शिवीगाळ करत केलेल्या अमानुष मारहाणीत एसटी बसचालकाचा मृत्यू झाला

भिवंडी : भिवंडी आगारात बस नेताना धक्का लागल्याने मुजोर रिक्षाचालकांनी शिवीगाळ करत केलेल्या अमानुष मारहाणीत एसटी बसचालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी चारपर्यंत बंद पाळला. त्यामुळे एसटी वाहतूक विस्कळीत झाली होती.ठाणे-भिवंडी ही शेवटची फेरी करून बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आगारात परतलेल्या बसचा आगाराच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या रिक्षास धक्का लागला. रिक्षाचालकाने बसचालक प्रभाकर गायकवाड यांना शिवीगाळ केली. पण गायकवाड यांनी प्रवाशांना उतरवण्यासाठी बस आगारात नेली. वाहक पैसे जमा करण्यासाठी कार्यालयात गेला असताना गायकवाड हे रिक्षाचालकास जाब विचारण्यास गेले. पण तेथे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.याची तक्रार देण्यासाठी गायकवाड शिवाजीनगर येथील पोलीस चौकीत गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रारच घेतलीच नाही. त्यामुळे झालेल्या मन:स्तापाने गायकवाड पोलीस ठाण्याच्या आवारातच खाली कोसळले व बेशुद्ध झाले. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त करीत रात्रीपासून बंद सुरू केला. गायकवाड हे मूळचे तुळजापूर तालुक्यातील अलगारा येथील रहिवासी होते. सध्या ते कांबा गावात आपल्या परिवारासह राहत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच पत्नी पूजा हिने निजामपूर पोलीस ठाणे गाठले. फुटेज पाहून रिक्षाचालकांनी मारहाण केल्याचा आरोप केला. तर, इंदिरा गांधी रुग्णालयातही वारसाची सही न घेता परस्पर डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्याचा आरोप पूजा व त्यांची आई नंदा यांनी केला. जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजूत काढल्याने कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेतला. गायकवाड यांना दोन मुली व एक मुलगा असून एक भाऊ सैन्यात आहे. या घटनेनंतर शहरातील मुजोर रिक्षाचालकांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)