शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वाशीत बसच्या धडकेत मुलाचा मृत्यू

By admin | Updated: March 4, 2017 05:16 IST

बसच्या धडकेत एका शाळकरी मुलाचा मृत्यू होवुन दुसरा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी वाशीत घडली.

नवी मुंबई : बसच्या धडकेत एका शाळकरी मुलाचा मृत्यू होवुन दुसरा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी वाशीत घडली. दोघेही कोपरी येथील महापालिका शाळेचे नववीचे विद्यार्थी आहेत. त्यांना शाळेच्या शिक्षिकेने शाळा सुरू असताना खासगी कामासाठी बाहेर पाठवले होते. याप्रकरणी शक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.वाशी-कोपरखैरणे मार्गावर गावदेवी मंदिरालगत हा अपघात घडला. रमेश बोबडे (१५) व बाबू चव्हाण (१६) हे दोघे सायकलवरून जात असताना एनएमएमटी बसच्या धडकेने त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये रमेशचा मृत्यू झाला असून बाबू हा जखमी झाला आहे. दोघेही नववीचे विद्यार्थी असून कोपरी येथील महापालिका शाळेचे विद्यार्थी आहेत. शुक्रवारी शाळा सुरू असताना त्यांच्या शिक्षिका स्नेहल पाडेकर यांनी त्यांना खासगी कामासाठी वाशीला पाठवले होते. त्यानुसार हे दोघेही सायकलवरून वाशीला आले होते. परत जाताना त्यांना एमएमएमटी (एमएच ४३ एच ५१३०) या मार्ग क्रमांक ६२ च्या बसची धडक बसली. वाशी डेपोकडून कल्याणच्या दिशेने बस जात होती. यामध्ये रमेशचा मृत्यू झाला, तर बाबू जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेप्रकरणी एमएमएमटी बस चालक दीपक रोहिदास पाटील (४९) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले. तर शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना खासगी कामासाठी बाहेर पाठवल्यामुळे शिक्षिका स्नेहल पाडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे पालिका शिक्षण अधिकारी संदीप संगवी यांनी सांगितले. तसेच मयत विद्यार्थी रमेशच्या कुटुंबीयांना विम्याचे दीड लाख रुपये मदत स्वरूपात दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>कारवाईची मागणी शिक्षिकेच्या हलगर्जीमुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने तिच्यावर सक्त कारवाईची मागणी पालकांकडून होत आहे. एकीकडे महापालिका शाळांचा दर्जा उंचावत असताना, शिक्षकच विद्यार्थ्यांना खासगी कामासाठी जुंपत असल्याचा संतापही व्यक्त होत आहे.