शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबारात सुरक्षारक्षकाचा मृत्यू

By admin | Updated: December 22, 2016 04:06 IST

बांधकाम व्यावसायिक समजून दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला.

डोंबिवली : बांधकाम व्यावसायिक समजून दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी मानपाडा रोडवरील अंगण हॉटेलसमोर घडली. या घटनेत सुरक्षारक्षक विकी ऊर्फ विवेक शर्मा (३९, रा. वांगणी) यांच्या डोक्यात गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. काटई गावातील संगीता निवासमध्ये बांधकाम व्यावसायिक अमित पाटील राहतात. वांगणी आणि डोंबिवलीत त्यांची बांधकामे सुरू आहेत. पाटील हे शिवसेनेच्या माध्यमातून काटई परिसरात सामाजिक कार्येही करतात. अमित बुधवारी दुपारी २.३० च्या सुमारास विकीसोबत बाहेर जाण्यासाठी गाडीतून निघाले होते. मात्र, त्या वेळी अमित यांनी घरातून काही तरी आणण्यासाठी विकी यांना पुन्हा आपल्या घरी पाठवले आणि ते गाडीत चालकाच्या जागेवर बसून वाट पाहत होते. विकी काही मिनिटांत परतले, परंतु तेथे दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एकाने त्यालाच अमित पाटील समजून गोळीबार केला. त्यात विकी यांच्या डोक्याला गोळी लागली. त्यानंतर हल्लेखोर साथीदाराच्या दुचाकीवरून कल्याण-शीळमार्गे पळून गेले. पाटील आणि परिसरातील नागरिकांनी विकी यांना शिवाजी उद्योगनगरमधील आॅप्टिलाइट या खासगी रु ग्णालयात गेले. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्यातून गोळी काढली मात्र तरिही त्यांचा मृत्यू झाला. या गोळीबाराची माहिती मिळताच मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश राऊत, नारायण देशमुख यांनी काटई येथील घटनास्थळी पंचनामा केला. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, रमेश जाधव आदींनी रुग्णालयात धाव घेतली. अप्पर पोलीस आयुक्त शरद शेलार यांनीही घटनास्थळी भेट दिली. गोळीबाराचे कारण समजले नसले तरी हा हल्ला व्यावसायिक अथवा राजकीय वैमनस्यातून झाला असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)