शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

जोगेश्वरीत सरावानंतर एका गोविंदाचा मृत्यू

By admin | Updated: August 11, 2014 03:35 IST

सानपाड्यात एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जोगेश्वरीतील बेहराम नगरमधील ओम साई गोविंदा पथकातील ऋषिकेश पाटील (वय १९) या गोविंदाचा शनिवारी मध्यरात्री सरावानंतर अचानक मृत्यू झाला.

मुंबई : सानपाड्यात एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जोगेश्वरीतील बेहराम नगरमधील ओम साई गोविंदा पथकातील ऋषिकेश पाटील (वय १९) या गोविंदाचा शनिवारी मध्यरात्री सरावानंतर अचानक मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा गोविंदा मंडळांमध्ये खळबळ उडाली आहे. दहीहंडीच्या सरावानंतर ऋषिकेशला चक्कर आल्याने विलेपार्ले येथील कूपर रूग्णालयात दाखल केले होते. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, वाकोला, सांताक्रूझ येथे सराव करताना आठ गोविंदा जखमी झाले आहेत. यात एका बारा वर्षाच्या गोविंदाचाही समावेश आहे. गणेश नगरमध्ये राहणारा ऋषिकेश नेहमीप्रमाणे शनिवारीही गोविंदाचा सराव करण्यास हजर होता. सराव केल्यानंतर मित्रांसोबत तो रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत होता. दरम्यान रात्री साडेबारा वाजता चक्कर आल्याने ऋषिकेश जमिनीवर कोसळला. त्यावेळी मित्रांनी अधिक उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुभाष वेळे यांनी दिली. शवविच्छेदनानंतर ऋषिकेशच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. तरी या घटनेची नोंद घेतली असून, अधिक तपास सुरू असल्याचे वेळे यांनी सांगितले.वाकोला, सांताक्रूझ येथे दहीहंडीचा सराव करताना आठ गोविंदा जखमी झाले. आश्रय संस्थेद्वारे दहीहंडी पथकांसाठी सलामीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा प्रकार घडला. बारा वर्षाखालील गोविंदांना सहभागी करू नये असा निर्णय झालेला असतानादेखील या सराव शिबिरात अनेक बालगोविंदा सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. थर रचत असताना तोल जाऊन गोविंदा खाली कोसळले. जखमी गोविंदांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे गोविंदा अंधेरीतील मालपा डोंगरी येथे राहणारे होते. (प्रतिनिधी)