शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भोर-महाड रस्त्यावरील अपघातात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: May 17, 2016 17:48 IST

नांदगाव वळणावर खोदलेल्या चारीत घसरलेल्या दुचाकीवरून समोरून येणारा टेम्पो गेल्याने संदीप कोंडिबा खिलारे (वय ३५, रा. मुंबई) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमत - 
भोर (पुणे), दि. 17 - भोर - महाड रस्त्यावर झालेल्या अपघातात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. नांदगाव वळणावर खोदलेल्या चारीत घसरलेल्या दुचाकीवरून समोरून येणारा टेम्पो गेल्याने संदीप कोंडिबा खिलारे (वय ३५, रा. मुंबई) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ९ वाजता ही  घटना घडली. टेम्पोचालकाला भोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
याबाबत भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो (एमएच ०६ बी.पी.) महाडवरून भोरकडे येत होता. दुचाकीवर ( एमएच १२ एल.डब्ल्यू. ५०५५) संदीप हा भोरकडून महाडकडे जात होता. नांदगाव गावच्या वळणावर आल्यावर रस्त्यात चारी काढली आहे. त्याचा अंदाज न आल्यामुळे चारीवर दुचाकी आदळून तो खाली पडला. दरम्यान, समोरून येणारा टेम्पो त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची खबर टेम्पोचालक राकेश सुरेश भोईर (वय ३०, रा. रोहा, जि. रायगड) यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी भोईरला ताब्यात घेतले आहे.
 
चौकट पाईपलाईनसाठी रस्ता खोदला
भोर-महाड रस्त्यावर नांदगावजवळ पाईपलाईन करण्यासाठी रस्ता खोदून मोठी चारी काढली आहे. ती व्यवस्थित न बुजवता तिथे दगड मातीचा ढिगारा केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून, रस्ता खोदण्याची परवनागी घेतली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदरच्या चारीमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत.