शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

डोलीत घालून तीन किमी पायपिट, तरीही वेळेत उपचार न मिळाल्याने माता-बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 07:04 IST

आशा कार्यकर्ती मंगला वारे हिने १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, रुग्णवाहिका अडीच तासांंनंतर गावाच्या वेशीवर पोहोचली. 

लोकमत न्यूज नेटवर्कखोडाळा : मोखाडा तालुक्यातील खोडाळा परिसरातील अतिदुर्गम आमले येथील मनीषा सन्या दोरे (२५) या गरोदर आदिवासी महिलेस प्रसूतीच्या वेदनाकाळात रुग्णवाहिका आणि उपचार वेळेत मिळाले नाहीत. या महिलेचे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात १७ नोव्हेंबरला सिझरिंग करण्यात आले. मात्र, त्याच रात्री बाळाचा मृत्यू झाला आणि महिला अत्यवस्थ झाली. या महिलेवर उपचार सुरू असताना तिचाही गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता मृत्यू झाला.

अतिदुर्गम आमले येथील मनीषा सन्या दोरे (२५) या सात महिन्यांच्या गरोदर आदिवासी महिलेला अचानक रक्तस्राव आणि प्रसूतिवेदना मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास होऊ लागल्या. या वेळी येथील आशा कार्यकर्ती मंगला वारे हिने १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, रुग्णवाहिका अडीच तासांंनंतर गावाच्या वेशीवर पोहोचली. 

दरम्यानच्या काळात येथील ग्रामस्थांनी या महिलेस डोली करून तीन किलोमीटर पायपीट करत खोडाळा-वाडा या मुख्य रस्त्यावर आणले. या अडीच तासांत महिलेच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव आणि पाणी बाहेर पडले.अशा अवस्थेतच तिची खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून पुढील उपचारासाठी तिला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्याच रात्री तिचे सिझरिंग करण्यात आले. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, त्याच रात्री त्या बाळाचा मृत्यू झाला आणि मनीषाही अत्यवस्थ झाली. तिच्यावर उपचार सुरू असतानाच मनीषाचा गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

या महिलेला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर ड्युटीवर असलेल्या डाॅक्टरांनी प्रथमोपचार केले. तिचा रक्तदाब कमी झाल्याने तसेच रक्तस्राव होत असल्याने तिला तातडीने नाशिकला हलविण्यात आले. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेली १०८ रुग्णवाहिका कोविड सेंटरला दिली आहे. आम्ही १०८ ची अनेकदा मागणी केली आहे.- डाॅ. सागर मुकणे,वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र, खोडाळा

मनिषा दोरे ही महिला वेदनेने तळमळत होती. अशा अवस्थेत आम्ही डोली करून तीला मुख्य रस्त्यावर आणले. मात्र, रुग्णवाहिका अडीच तासाने आली. या काळात तीच्या शरीरातुन खुप रक्तस्राव झाला आणि पाणी ही बाहेर पडले. तीला वेळेवर उपचार मिळाले असते तर माता आणि बाळ दोन्ही ही वाचले असते. अशा अनेक घटना आमच्या गावात घडल्या आहेत. याची दखल कोणी घेईल का  ?- पांडुरंग लहु वारे, ग्रामस्थ आमले

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाPregnancyप्रेग्नंसी