उल्हासनगर : मोना मार्केट परिसरात मंगळवारी दुपारी अनैतिक संबंधातून प्रियकराने प्रेयसीला पेटवून दिले. त्यामध्ये तिचा जागीच मुत्यू झाला तर जळलेल्या अवस्थेत प्रेयसीने प्रियकराला कवटाळल्याने तोही ९५ टक्के भाजला असून, त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. यामधील मृत महिलेचे नाव पार्वती म्हेत्रे (४५) असून, गंभीर जखमी झालेल्या पुरुषाचे नाव नरसिंग हनुमंता तलाडी (५०) आहे.दोघेही मोना मार्केटमध्ये कामाला होते. अनैतिक संबंधातून दोघांमध्ये तू तू मै मै होऊन रागाच्या भरात नरसिंग याने सोबत आणलेले रॉकेल पार्वतीच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. दोघांनाही २० ते २२ वर्षे वयाची मुले आहेत. नरसिंग काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याचा जबाब नोंदल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा शक्य आहे. (प्रतिनिधी)
प्रेयसीचा मृत्यू तर प्रियकराची मृत्यूशी झुंज
By admin | Updated: March 22, 2017 02:14 IST