शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये जिवंत जाळलेल्या वडापाव विक्रेत्याचा मृत्यू

By admin | Updated: March 21, 2017 14:22 IST

उल्हासनगरमधील वडापाव विक्रेते चंदू रामरख्यानी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारी त्यांना किरकोळ कारणावरुन एका व्यक्तीकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता

ऑनलाइन लोकमत
उल्हासनगर, दि. 21 - उल्हासनगरमधील वडापाव विक्रेते चंदू रामरख्यानी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारी त्यांना किरकोळ कारणावरुन एका व्यक्तीकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यात ते 90 टक्के भाजले होते.
उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात समोरासमोर वडापावविक्रीचे स्टॉल लावण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान ‘महालक्ष्मी जम्बो वडापाव’ दुकानदार चंदू रामरख्यानी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्यात आले. या घटनेत रामरख्यानी हे 90 टक्के भाजले होते. त्यांच्यावर ऐरोलीच्या नॅशनल बर्न रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, रामरख्यानी यांना जाळण्याचा प्रयत्न करणारा सुरेश आहुजा हा फरार आहे.
 
उल्हासनगर कॅम्प नं. ४, रेल्वे स्टेशनबाहेर रामरख्यानी यांनी दुकान भाड्याने घेऊन वडापाव सेंटर सुरू केले. यापूर्वी सुरेश आहुजा याने हे दुकान भाड्याने घेऊन वडापावचा धंदा केला होता. महालक्ष्मी सेंटरसमोर आहुजा याचे नवीन वडापाव दुकान मंगळवारपासून सुरू होण्याची कुणकुण रामरख्यानी यांना लागली होती. याबाबत, आक्षेप घेतल्याने सुरेश व रामरख्यानी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या रागातून सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास आहुजाने बाटलीतून आणलेले पेट्रोल रामरख्यानी यांच्या अंगावर टाकून त्यांना पेटवून दिले.
 
भरदिवसा घडलेल्या या अमानुष घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रामरख्यानी हे ९० टक्के भाजले.  सुरुवातीला त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आल्याचे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांनी सांगितले. आरोपी आहुजा हा फरार झाला आहे.