शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जोडमोहा वनक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू

By admin | Updated: March 13, 2017 03:56 IST

कळंब तालुक्यातील जोडमोहा वनक्षेत्रांतर्गत विठ्ठलवाडी शिवारात रविवारी दुपारी नर बिबट्याचा कुजलेला मृतदेह आढळला.

यवतमाळ : कळंब तालुक्यातील जोडमोहा वनक्षेत्रांतर्गत विठ्ठलवाडी शिवारात रविवारी दुपारी नर बिबट्याचा कुजलेला मृतदेह आढळला. आठवड्यात सलग दुसरा बिबट मृत झाला आहे. या दोन्ही घटनांमध्ये बिबटावर विष प्रयोगाचा संशय व्यक्त होत आहे. वटबोरी जवळच्या विठ्ठलवाडी येथे साडेचार ते पाच वर्ष वयाचा नर बिबट मृतावस्थेत आढळला. त्याचे शरीर वरच्या भागाने कुजलेले होते. या बिबटाचे नख, दात, शेपटाचा गोंडा, मिशा शाबूत होत्या. या बिबटाचे पोटही भरलेले होते. त्याच्या एकंदरच आकारावरून हा बिबट चांगला धष्टपुष्ट असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या शरीरावर कुठेही जखमा नव्हत्या. त्यामुळे या बिबट्याचा मृत्यू हा विष प्रयोगातूनच झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे. बिबटाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा व्हिसेरा औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. तेथील अहवालावरूनच बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र यवतमाळलगतच्या टाकळी शिवारातील घटनेनंतर चौथ्याच दिवशी जोडमोह परिक्षेत्रातील बिबट मृत्यू प्रकरण पुढे आले. यातून येथील वन्यजीव धोक्यात असल्याचे दिसून येते. या वन्यजीवांसाठी मानद वन्यजीव संरक्षक आणि वनविभागातील विविध यंत्रणेकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. त्यांच्या एकंदरच कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह लावल्या जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)