शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; शाहबाज सरकारने बनवले फील्ड मार्शल...
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
6
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
7
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
8
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
9
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
10
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
11
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
12
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
13
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
14
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
15
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
16
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
17
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
18
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
19
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
20
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट

आजारी अवस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू

By admin | Updated: July 25, 2016 19:28 IST

वाशिम जिल्ह्यातील कवरदरी शिवारात आजारी अवस्थेत आढळलेले बिबट दुपारी चारच्या सुमारास अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. २५  : सोमवारी सकाळी वाशिम जिल्ह्यातील कवरदरी शिवारात आजारी अवस्थेत आढळलेले बिबट दुपारी चारच्या सुमारास अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत पावले. उपासमार व ट्रिपॅनोसोमा या घातक आजारांच्या विषाणूंची लागण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्यावर उपचार करीत असलेल्या डॉ. फरिन फानी यांनी ह्यलोकमतह्णला दिली.वाशिम जिल्ह्यातील मालेगाव रेंजमधील कवरदरी शिवारात सोमवारी सकाळी आजारी अवस्थेत एक बिबट आढळून आले. त्यास दुपारी १२.३0 वाजता अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. ग्लानी अवस्थेत असलेल्या बिबट्यावर तत्काळा पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. फरिन फानी, डॉ. किशोर पजई, डॉ. सुचित्रा सूर्यवंशी व डॉ. राऊळकर यांनी उपचार सुरू केले. शरीरावर कुठल्याही जखमा नसलेल्या या बिबट्यास प्रारंभी सलाइन लावण्यात आले. दरम्यान, त्याचे रक्त तपासणीसाठी पाठविण्यात आले. रक्ताचा अहवाल आल्यानंतर त्यास ट्रिपॅनोसोमा या घातक आजाराच्या विषाणूंची लागण झाली असल्याची माहिती मिळाली. ग्लानी अवस्थेतून कोमामध्ये गेलेला हा बिबट दुपारी ४.३0 च्या सुमारास मृत पावला. त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदनानंतर तो गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून उपाशी होता, अशी माहिती समोर आली. उपासमार सुरू असतानाच आजराची लागण झाली असल्यामुळे बिबट मरण पावले, असे डॉ. फरिन फानी ह्यलोकमतह्णशी यांनी स्पष्ट केले. शवविच्छेदनानंतर कृषी विद्यापीठाच्या परिसरातच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.