शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आजारी अवस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू

By admin | Updated: July 26, 2016 01:02 IST

वाशिम जिल्ह्यातील घटना; उपासमार व ट्रिपॅनोसोमा आजाराने मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी दिली माहिती

किन्हीराजा/कवरदरी (जि. वाशिम): वाशिम जिल्ह्यातील चोहोबाजूंनी जंगलाने व्यापलेल्या कवरदरी या गावात सोमवार, २५ जुलै रोजी बिबट्या आढळला. आजारी असलेल्या या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचार्‍यांना सलग दोन तास प्रयत्न करावे लागले. त्यानंतर अकोला येथे उपचारार्थ पाठवलेल्या बिबट्याचा सायंकाळी ४.३0च्या सुमारास मृत्यू झाला. कवरदरी येथील काही ग्रामस्थांना आजारी बिबट गावानजीकची नदी ओलांडून येत असताना सोमवारी सकाळी ६.३0 वाजता आढळून आला. घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वनक्षेत्राच्या गस्तीवर असलेले वनरक्षक सी.डी. डहाके यांना दिली. तत्काळ वनाधिकार्‍यांचा चमूने ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला गावात प्रवेश करण्यापासून रोखण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले. यादरम्यान मोठय़ा शिताफीने जाळे टाकून बिबट्याला जेरबंद करण्यात आले. सकाळी ६.३0 वाजतापासून सुरू झालेला बिबट्याचा हा थरार ग्रामस्थांनी ८.३0 पर्यंंत अनुभवला. दरम्यान, आजारी अवस्थेतील बिबट अकोला येथे उपचारार्थ आणले. मात्र अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना ते आजारी बिबट मरण पावले.उपासमार व ट्रिपॅनोसोमा या घातक आजारांच्या विषाणूंची लागण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्यावर उपचार करीत असलेल्या डॉ. फरिन फानी यांनी ह्यलोकमतह्णला दिली. शवविच्छेदनानंतर तो बिबट्या गत आठ ते पंधरा दिवसांपासून उपाशी होता, अशी माहिती समोर आली. शवविच्छेदनानंतर कृषी विद्यापीठाच्या परिसरातच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ----------------सोमवार, २५ जुलै रोजी सकाळी एक बिबट लोकवस्तीकडे येत असल्याचे कवरदरी शिवारातील नागरिकांनी पाहिले. आजारी असल्याने ग्लानी अवस्थेत भटकणार्‍या बिबटास जाळे टाकून पकडण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यास अकोल्यतील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय रूग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्याला वाचविण्यासाटी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र दुपारी ४.३0 च्या सुमारास ते मृत पावले.- रामराव खोपडेवनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक, मालेगाव