शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत इंटरव्ह्यू देऊन परतणा-या तरुणाचा हिट अँड रनमध्ये मृत्यू

By admin | Updated: July 17, 2017 17:18 IST

इंटरव्ह्यू देऊन घरी परतणा-या एका 21 वर्षीय तरुणाचा शनिवारी दुपारी जोगेश्वरी पश्चिमेला रस्ते अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 17 -  इंटरव्ह्यू देऊन घरी परतणा-या एका 21 वर्षीय तरुणाचा  शनिवारी दुपारी जोगेश्वरी पश्चिमेला रस्ते अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. साहील मिश्रा असे मृत तरुणाचे नाव आहे. नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊन साहील त्याच्या दुचाकीवरुन घरी परतत असताना हा दुर्देवी अपघात घडला. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर जात असताना साहिलच्या दुचाकीची टेम्पोबरोबर धडक झाली. त्यानंतर  तोच टेम्पो साहिलच्या अंगावरुन गेला.  
 
या अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरुन  फरार झाला. पोलीस या टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत. पदवीधर असलेल्या साहिलने अंधेरी येथे जॉब इंटरव्ह्यूला जाण्यासाठी सकाळी घर सोडले होते असे त्याचे काक सुरजीत मिश्रा यांनी सांगितले. या घटनेचा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीय. अपघाताच्यावेळी तिथून जाणा-या काही वाहनचालकांनी सफेद रंगाच्या टेम्पोने बाईकला धडक दिल्याचे पाहिले. 
 
आणखी वाचा 
 
पण कोणीही टेम्पोचा नंबर लिहून घेतला नाही अशी माहिती ओशिवरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी दिली. घटनास्थळाच्या जवळपास कुठलाही कॅमेरा नसल्याने पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचे आव्हान आहे. पोलीस आता वेर्स्टन एक्सप्रेस हायवेवरील जोगेश्वरी ते गोरेगाव पट्टयातील कॅमे-याची तपासणी करतील त्यातून त्यांना एखादा दुवा मिळू शकतो. अज्ञात टेम्पो चालका विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.