शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमधील त्या हर्लेक्विन बेबीचा मृत्यू

By admin | Updated: June 14, 2016 10:03 IST

लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये शनिवारी पहाटे जन्माला आलेल्या 'हर्लेक्विन बेबी'चा सोमवारी दुपारी मृत्यू झाला.

नागपूर, दि. १४ -  लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये शनिवारी पहाटे जन्माला आलेल्या 'हर्लेक्विन बेबी'चा सोमवारी दुपारी मृत्यू झाला. या बालिकेला वाचविण्यासाठी हॉस्पिटलने शर्थीचे प्रयत्न केले. परंतु संसर्ग झाल्याने बाळ दगावल्याचे सांगण्यात येते. 'हर्लेक्विन इथायसिस' हा दुर्मिळ त्वचारोग आहे. शनिवारी या आजाराच्या बालिकेला एका महिलेने लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जन्म दिला. 
रुग्णालय प्रशासन या बालिकेच्या उपचारावर विशेष लक्ष ठेवून होते. उपचाराचा संपूर्ण खर्च हॉस्पिटलने स्वत:वर घेतला होता. बाळाला बघण्याची नागपूरच्या काही बालरोग तज्ज्ञांनी इच्छा व्यक्त केली. परंतु, बाळावर निओनेटल आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याने पाहता आले नाही. सोमवार १३ जून रोजी बाळाच्या हृदयाची २-डी 'इको' चाचणी करण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच बाळ दगावले. गेल्या दोन दिवसांपासून बाळाची श्‍वसन यंत्रणा तसेच नाडीचे ठोके सामान्य होते. हृदयाच्या इको चाचणीनंतर पुढील उपचाराची दिशा ठरविण्यात येणार होती. 
दोन दिवस उपचाराला प्रतिसादही मिळत होता. त्यामुळेच शरीराला आवश्यक घटक मिळावे यासाठी नाकात नळी टाकून दूध देण्यात आले. 
परंतु, संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त करीत बाळ दगावल्याचे सांगण्यात आले. ही माहिती बाळाच्या वडिलांना दिली. संशोधनासाठी हे बाळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या म्युझियममध्ये संग्रहित ठेवण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. दोन दिवस येथील डॉ. नानोटी, डॉ. निलोफर मुजावर, डॉ. मीनाक्षी गिरीश, डॉ. यश बानाईत, डॉ. प्राची दीक्षित बाळावर लक्ष ठेवून होते. परंतु त्यांचे प्रयत्न अखेर अपयशी ठरले.
(प्रतिनिधी)