शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
3
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
4
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
5
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
6
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
7
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
8
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
9
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
10
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
11
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
12
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
13
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
14
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
15
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
16
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
17
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
18
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
19
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
20
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?

नातवाच्या आत्महत्येनंतर धक्याने आजीचाही मृत्यू

By admin | Updated: August 18, 2016 21:00 IST

केज तालुक्यातील कानडी बदन येथे एका युवकाने स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली

ऑनलाइन  लोकमतबीड, दि. 18 - केज तालुक्यातील कानडी बदन येथे एका युवकाने स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर नातवाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होताच त्याचे दु:ख सहन न झाल्याने इकडे घरी आजीचाही मृत्यू झाल्याची घटना आज घडली. एकाच दिवशी घरातील दोघांचा मृत्यू झाल्याने सबंध गावावर शोककळा पसरली आहे. अनिकेत रामकिसन नाईकवाडे (१८) असे मयताचे नाव आहे. अनिकेत हा दहावी नापास झाला होता. त्यानंतर त्याने शिक्षणाला रामराम ठोकला व शेती व्यवसायात स्वत:ला झोकून दिले. दिवसभर काम करून रात्री झोपण्यास तो शेतात जात होता. वडील रामकिसन नाईकवाडे व मोठ्या भावास हातभार लावू लागला.

दररोज सकाळी ८ च्या दरम्यान शेतातून घरी परतणारा अनिकेत आला नसल्याने वडील व भावाने शेताकडे धाव घेतली. ओढ्याजवळ असणाऱ्या लिंबाच्या झाडाला त्याने गळफास घेतल्याचे त्यांना आढळून आले. सर्व काही खेळीमेळीत सुरू असतानाच अचानकच अनिकेतने हे टोकाचे पाऊल उचलले. शवविच्छेदनानंतर दुपारी १२ वाजता त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  आत्महत्येचे कारण न समजल्याने नातेवाईकही अस्वस्थ झाले आहेत. नातवाच्या विरहाचे दु:ख सहन न झाल्याने आजी बायनाबाई रतन नाईकवाडे (वय ७५) यांचाही मृत्यू झाला. बयनाबाई यांचे वय झाल्याने त्या अनिकेतच्या अंत्यसंस्कारास आल्या नव्हत्या. मात्र, या घटनेनंतर त्या शांतच होत्या. अखेर त्यांनीही नातवाच्या विरहातच प्राण सोडले. सायंकाळी सहा वाजता बायनाबाई नाईकवाडे यांच्या पार्थिवावरही अंत्यसंस्कार झाले. एकाच दिवशी आजी- नातवाच्या मृत्यूमुळे कानडी बदनमध्ये शोककळा पसरली होती. वडील रामकिसन रतन नाईकवाडे यांच्या खबरीवरून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. जमादार बशीर शेख या प्रकरणाचा तपास करीत आहेत.रक्षाबंधनावर दु:खाचे सावटअनिकेतची मोठी बहीण बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. रक्षाबंधनाच्या सणानिमित्ताने सकाळपासून उत्साहाचे वातावरण होते. शेतातून भाऊ परतल्यानंतर राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित होता. भावाऐवजी त्याचे कलेवरच घरी आल्यावर तिच्यावर आकाश कोसळले. यातच त्यापाठोपाठ झालेल्या आजीच्या निधनाने  सबंध गावावर शोककळा पसरली आहे.