शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा येथील ५ वर्षाच्या मुलाचा कावीळमुळे मृत्यू

By admin | Updated: June 30, 2016 21:17 IST

वडाळा येथे राहणाऱ्या ५ वर्षाच्या मुलाचा कावीळमुळे २२ जून रोजी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात साथीच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे.

- साथीच्या आजाराचा पहिला बळी

मुंबई : वडाळा येथे राहणाऱ्या ५ वर्षाच्या मुलाचा कावीळमुळे २२ जून रोजी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात साथीच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबईकरांनी विषेश काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेने केली आहे.काविळाचा संसर्ग रोखण्यासाठी दूषित अन्न आणि पाणी पिणे टाळा या विषयी जनजागृती करण्यात येत आहे. वडाळा येथील ५ वर्षाच्या मुलाला १३ जून रोजी काविळच्या उपचारांसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असूनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने या मुलाला १७ जून रोजी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरु असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. २२ जून रोजी या मुलाचा मृत्यू झाला. जुन महिन्यात काविळीचे एकूण १६६ रुग्ण आढळून आले आहेत. जुन २०१५ मध्ये कावीळचे ९९ रुग्ण होते. मे २०१६ मध्ये १३५ रुग्ण आढळले होते. गॅस्ट्रोचे जून महिन्यात ९७९ रुग्ण आढळून आले आहेत. तर कॉलराचा १ रुग्ण आढळून आला आहे. दूषित पाण्यामुळे होणारे आजार जून महिन्यात आढळून आले आहेत. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीला साथीच्या आजारांचा आलेख चढता असल्यामुळे विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेने केला आहे. जून महिन्यात मलेरियाचे ४८२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत, तर मे महिन्यात मलेरियाचे ४२३ संशयित रुग्ण आढळले होते. तर डेंग्यूचे १५३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मे महिन्यात १२९ रुग्ण आढळून आले होते. लेप्टोचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी जुन महिन्यात डेंग्यूचे ४ रुग्ण आढळले होते. पावसाळ्यात जागोजागी पाणी साठते, त्यातून चालणे टाळा असे आवाहन कार्यकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केले आहे. गेल्या वर्षी लेप्टोने डोके वर काढले होते, त्यामुळे मुंबईकरांनी विशेष काळजी घ्या, असेही डॉ. केसकर यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)