शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांच्या पुण्यतिथीला फाटा

By admin | Updated: December 1, 2015 01:32 IST

राष्ट्रपुरुषांची केवळ जयंती साजरी करायची, पुण्यतिथीचे कार्यक्रम करायचे नाहीत, असा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारनेच २०१२मध्ये घेतला होता. नव्या सरकारने आज एक

- यदु जोशी,  मुंबईराष्ट्रपुरुषांची केवळ जयंती साजरी करायची, पुण्यतिथीचे कार्यक्रम करायचे नाहीत, असा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारनेच २०१२मध्ये घेतला होता. नव्या सरकारने आज एक आदेश काढून तीच भूमिका कायम ठेवली आहे. कोणकोणत्या राष्ट्रपुरुषांची जयंती आणि शहीद दिवस २०१६मध्ये साजरे करायचे याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी काढला. राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये ते साजरे करणे अनिवार्य असेल. हे दिवस साजरे करायचे म्हणजे नेमके काय करायचे हेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे, प्रतिज्ञेचे वाचन, शपथ घेणे आदींचा समावेश आहे. महात्मा जोतिराव फुले यांची पुण्यतिथी शासकीय पातळीवर साजरी करण्यात आली नाही म्हणून मध्यंतरी टीकेचे सूर उमटले होते. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रपुरुषांची पुण्यतिथी शासकीय पातळीवर साजरी न करण्याचा शासकीय आदेश २०१२मध्येच काढण्यात आला होता. तोच अजूनही अंमलात आहे. केवळ २३ मार्चचा शहीद दिन, २१ मे रोजीचा दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन (राजीव गांधी पुण्यतिथी), असे काही अपवाद करण्यात आले आहेत. जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रताप, लोकमान्य टिळक, राजर्षी शाहू महाराज, यशवंतवराव चव्हाण, वसंतराव नाईक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, पंडित दीनदयाळ उपाध्याय, लाल बहादूर शास्री, महर्षी वाल्मीकी, इंदिरा गांधी, वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांची जयंती साजरी केली जाणार आहे. तसेच, २६ नोव्हेंबरला संविधान दिनाचा तर २० आॅगस्टला सद्भावना दिनाचे शासकीय कार्यक्रम राज्यपातळीवर होतील. कन्नमवार, कुरुंदकर स्मारकासाठी निधी- माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील स्मारकाच्या पुढील बांधकामासाठी ५० लाख रुपयांचा निधी शासनाने आज मंजूर केला. यासाठी याआधी ३ कोटी ४६ लाख रुपये शासनाने दिले आहेत. - वचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या नांदेड येथील स्मारकाच्या पुढील बांधकामासाठी ३३ लाख ७५ हजार रुपये मंजूर करण्यात आले. यासाठी याआधी सरकारने ७० लाख रुपये दिले होते.