शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून पडून दोघांचा मृत्यू

By admin | Updated: August 3, 2016 02:37 IST

रबाळे ते ऐरोली दरम्यान रेल्वे पटरीलगत दोन मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आले.

नवी मुंबई : रबाळे ते ऐरोली दरम्यान रेल्वे पटरीलगत दोन मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आले. त्यापैकी एकाची ओळख पटलेली असून दुसऱ्याविषयी पोलिसांना कसलीच माहिती कळलेली नाही. एकाच्या खिशात चिलीम आढळून आल्याने ते गर्दुल्ले असून नशेतच रेल्वेतून पडले असल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे.मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. रबाळे ते ऐरोली स्थानकादरम्यान ४०/४५ कि.मी. अंतरावर रुळालगतच्या पाण्याच्या चरीमध्ये मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता, त्याठिकाणी दोन मृतदेह आढळून आले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवले असता, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याचे स्पष्ट झाले. यावरून रात्रीच्या वेळी ते रेल्वेतून पडले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तर अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे आधारकार्ड व पॅनकार्ड आढळून आले आहेत. यावरून त्यांची ओळख पटली आहे. जगतसिंग किसन सिंग व संतराज यादव अशी त्या दोघा मृतांची नावे असून त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुरु असल्याचे वाशी रेल्वेचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद धावडे यांनी सांगितले. हे दोघेही २५ ते २७ वयोगटातले आहेत. दोघांच्याही खिशामध्ये चिलीम आढळून आलेली आहे. यावरून ते गर्दुल्ले असून रात्रीच्या वेळी नशेमध्ये रेल्वेतून पडले असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर रेल्वेतून पडल्यानंतर दोघेही रुळालगतच्या चरीमध्ये साचलेल्या पाण्यात बुडाले असावेत. सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. (प्रतिनिधी)