शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

अस्वलाच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

By admin | Updated: September 5, 2016 01:02 IST

बुलडाणा जिल्ह्यातील डोंगरशेवली शिवारातील घटनेत वृद्ध ठार, बालक जखमी.

बुलडाणा, दि. ४ : चिखली तालुक्यातील डोंगरशेवली शिवारातील एका शेतात काम करीत असलेल्या आजोबा व नातवावर अस्वलाने अचानक हल्ला केला. यात वृद्ध शेतकरी मोहम्मद शाह बिबिन शाह (वय ६५) यांचा मृत्यू झाला, तर नातू आमीन शाह यासीन शाह (वय १0) हा गंभीर जखमी झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेदरम्यान घडली. या घटनेतील जखमी अमिन शाह याच्यावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे डोंगरशेवली शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुलडाणा तालुक्यातील डोंगरशेवली येथील वृद्ध शेतकरी मोहम्मद शाह बिबिन शाह हे आपल्या दहा वर्षीय नातू आमीन शाह यासीन शाह याला घेऊन शेतात काम करायला गेले होते. दुपारदरम्यान या दोघांवरही अचानक अस्वलाने हल्ला केला. यात मोहम्मद शाह बिबिन शाह (वय ६५) यांचा मृत्यू झाला, तर नातू आमीन शाह यासीन शाह (वय १0) हा गंभीर जखमी झाला. यावेळी जखमी आमीन याने आवाज देऊन परिसरातील लोकांना जमा केले. त्यावेळी वृद्ध मोहम्मद शाह याचा मृतदेह शेतात पडून होता. शिवाय येथे अस्वलही उभे होते. ग्रामस्थांनी तेथून अस्वलाला हाकलून लावले. यानंतर गंभीर जखमी आमीन याला बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला तत्काळ औरंगाबाद येथे उपचारार्थ हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचले. यावेळी आरएफओ झोळे यांनी आमीनच्या उपचारार्थ नगदी १0 हजारांची मदत उपलब्ध करुन दिली, तर वनविभागाच्या दुसर्‍या पथकाने डोंगरशेवली येथे घटनास्थळावर पंचनामा करुन वृद्धाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.चार महिन्यांत तिसरी घटना चिखली तालुक्यातील डोंगरशेवली, करवंड हे गाव ज्ञानगंगा अभयारण्याला लागून आहे. त्यामुळे बर्‍याचवेळा वन्य जीव लोकवस्तीमध्ये प्रवेश करतात. गत महिन्यात करवंड वनपरिक्षेत्रात दोन अस्वलाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला होता. दुसर्‍या घटनेत एक जखमी झाला होतो. यानंतर वनविभागाने अस्वलाला पकडून अंबाबरवा अभयारण्यात सोडले होते. आता डोंगरशेवली येथे पुन्हा अस्वलाने हल्ला केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.