शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

२९३ रुग्ण पॉझिटिव्ह चौघांचा मृत्यू

By admin | Updated: November 14, 2014 00:50 IST

यावर्षी ७ नोव्हेंबरपर्यंत शहरातील २९३ रुग्ण डेंग्यूच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले असून यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेने २३९६ रुग्णांचे रक्तजल नमुने गोळा गेले होते.

डेंग्यू अटॅक : हायकोर्टात मनपाकडून आकडेवारी सादरनागपूर : यावर्षी ७ नोव्हेंबरपर्यंत शहरातील २९३ रुग्ण डेंग्यूच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले असून यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेने २३९६ रुग्णांचे रक्तजल नमुने गोळा गेले होते. ही आकडेवारी आज, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आली. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरात सर्वत्र अस्वच्छता पसरली असून नागरिकांचे जीवन व आरोग्य धोक्यात आहे, याकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका पूनम प्राईड कॉन्डोमिनिअमचे अध्यक्ष एस. सी. बेरा यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याशिवाय वृत्तपत्रांमध्ये मनपाच्या निष्क्रियतेमुळे डेंग्यू झपाट्याने पसरत असल्याच्या बातम्या नियमित प्रकाशित होत आहेत. ही बाब लक्षात घेता गेल्या तारखेला न्यायालयाने शहरात डेंग्यूची काय स्थिती आहे व या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, यावर माहिती सादर करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले होते. त्यानुसार मनपाने विस्तृत माहिती दिली असून त्यातून वरील आकडेवारी समोर आली आहे. याप्रकरणावर आता १९ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. स्वच्छ व आरोग्यवर्धक वातावरण हा नागरिकांचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु, शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असेली कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट कंपनी आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावण्यात अपयशी ठरत आहे. जैविक व अजैविक कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्या जात नाही. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. यामुळे डेंग्यूचा प्रकोप वाढून नागरिकांचे जीवन धोक्यात आल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक, महानगरपालिका आयुक्त, कनक रिसोर्सेस आदींना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. देवेन चव्हाण, तर मनपातर्फे अ‍ॅड. एस. के. मिश्रा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)मनपाच्या उपाययोजनाजनजागृतीसाठी ३ लाख पत्रके, १५०० पोस्टर व बॅनरचे वाटप.हत्तीरोग विभागाला डासअळीनाशक औषधाचा पुरेसा पुरवठा.संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविणे.व्हॉट्स अ‍ॅप व प्रसारमाध्यमांवरून डेंग्यूपासून संरक्षणाचा प्रचार.मोठ्या डबक्यांमध्ये मासे सोडण्याची कार्यवाही सुरू आहे.मनपा शाळांमध्ये लोक प्रशिक्षणाचे कार्य सुरू आहे.