शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

तलासरीत ५ महिन्यांत कुपोषित १६ बालकांचा मृत्यू

By admin | Updated: September 22, 2016 03:10 IST

तलासरी तालुक्यात ० ते ६ वयोगटातील कमी वजनाच्या 16 बालकांचा उपचारा अभावी पाच महिन्यात मृत्यू झाल्याचे भीषण वास्तव समोर आले

सुरेश काटे,

तलासरी- तलासरी एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील कपाट घोटाळा , अंगणवाड्यामधील बोअरवेल घोटाळा गाजत असताना तलासरी तालुक्यात ० ते ६ वयोगटातील कमी वजनाच्या 16 बालकांचा उपचारा अभावी पाच महिन्यात मृत्यू झाल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.अमृत आहार योजनेचा अनियमति येणारा निधी , बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याचे रिक्त पद, तलासरी ग्रामीण रु ग्णालयात बाल उपचार केंद्राचा अभाव, अंगणवाड्यात कोंदाटलेले वातावरण या सर्वाचा परिणाम या बालकाच्या मृत्यू मागे असून सॅम च्या श्रेणीतील बालकांची कुपोषणाकडे वाटचाल तलासरीत सुरु आहे तलासरी तालुक्यात २०४ अंगणवाड्यातसेच ४४ मिनी अंगणवाड्या अशा एकूण २४८ अंगणवाड्या आहेत या पैकी १९८ अंगणवाड्या शासकीय व ५० अंगणवाड्याया मालकीच्या जागेत चालतात या शासकीय इमारती पैकी १० इमारती मोडकळीस आल्या असून त्यांच्या बांधकामाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे या अंगणवाड्यात ० ते ५ वयोगटातील सर्वेक्षित बालकांची संख्या वीस हजार सहाशे पंचवीस आहे.या बालकांमध्ये ४० बालके ही सॅम ची व ३२८ बालके मॅमची आहेत. ही आकडेवारी आॅगस्ट अखेरची असून मोखाड्यातील बाल मृत्यूने खडबडून जागे झालेल्या शासनाने पूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर या १९ सप्टेंबरपर्यंत केलेल्या सर्वेक्षणात मॅम च्या बालकांत लक्षणीय वाढ झाली आहे. या अंगणवाड्यातील बालकांची पूर्वी दर तीन महिन्याने आरोग्य तपासणी व्हायची ती आता सहा महिन्याने होते. या तपासणीसाठी तीन आरोग्य पथके तालुक्यात कार्यरत आहेत परतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तलासरी तालुक्यात ग्रामीण रु ग्णालयात बाल उपचार केंद्रच नाही. >अमृत आहारला निधी नाही, सेविकांना वेतन नाहीअंगणवाडीस्तरावर बाल विकास केंद्र सुरु करण्यात येऊन आठ वेळा योग्य आहार व औषध बालकांना लवकरच देण्यात येणार आहे. अशी माहिती तलासरीच्या प्रभारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधीकारी सावंत यांनी सांगितलेअमृत आहार योजनेचा निधी आला नसल्याने बालक माता या आहारा पासून वंचित असून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी केला आहे .मातांच्या हृदयाची घालमेलतलासरी तालुक्यातील बालकांना उपचारासाठी डहाणू येथे घेऊन जावे लागते त्यामुळे उपचारासाठी बालकाला तिथे नेण्यास त्याची माता तयार होत नाही कारण तिला कुटुंबाची काळजी असते. गेली तर ती घरच्या काळजीने उपचार अर्धवट सोडून परत येते. त्यामुळे बालक उपचारा विना राहते पण याचे खापर यंत्रणा बालकाच्या मातेवर फोडते पण बालकाच्या मातेची मानिसकता समजून घेत नाही.कोणत्याच अंगणवाडीमध्ये विद्युतपुरवठा नाही तालुक्यातील कोणत्याच अंगणवाड्यात विद्युत पुरवठा नाही. त्यामुळे कोंदट वातावरणात बालक, मातांना आहार घ्यावा लागतो. उन्हाळ्यात तर उष्णतेने बालकाची लाहीलाही होते पण वातानुकूलित कार्यालयात बसून निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना याची जाणीव कशी होणार? बालके कुपोषित राहू नये यासाठी अमृत आहार योजना आहे पण तिचा निधीच वेळेवर येत नसल्याने अमृत आहार योजने पासून बालके वंचित राहतात तलासरी तालुक्यात जून जुलै पासून या योजनेचा निधी आलाच नाही.