सुझान-हृतिकची कहाणी : 4क्क् कोटींची पोटगी हवी, 38क् कोटी देण्यास तयार
मुंबई : घटस्फोटाचा दावा दाखल करीत विभक्त झालेला बॉलीवूडचा सुपरहीरो हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान यांचा दावा न्यायालयात प्रलंबित असताना सुझान हिने हृतिककडून 400 कोटी रुपये पोटगी म्हणून मागितल्याचे सूत्रंकडून समजते. पण हृतिकने 380 कोटी रुपये देण्याचे मान्य केल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या वर्षापासून या दाम्पत्यात तणाव सुरू होता. काही आप्तेष्टांनी त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो फोल ठरला असून 17 वर्षाचे नातेसंबंध संपुष्टात येत हृतिक आणि सुझान विभक्त झाले आहेत. हृतिकने ही पोटगी देण्याचे मान्य केले तर त्यांचा घटस्फोट हा बॉलीवूडमधला सर्वात महागडा घटस्फोट ठरणार आहे. जर हृतिकने 400 कोटी रुपये पोटगी दिली तर आजर्पयत सर्वाधिक पोटगी देण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदविला जाईल. 14 डिसेंबर 2013 रोजी या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला होता. (प्रतिनिधी)
2000 मध्ये ‘कहो ना प्यार हैं’ या चित्रपटानंतर हृतिक-सुझान विवाहबद्ध झाले होते. त्यानंतर त्याचा ‘काइट्स’ हा चित्रपट आला. यात स्पॅनिश अभिनेत्री बार्बरा मोरीने काम केले होते. हृतिक आणि बार्बरामध्ये प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात होते. त्याच कारणावरून सुझान व हृतिक यांच्यातील नातेसंबंध ताणले होते.