शहरं
Join us  
Trending Stories
1
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
2
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
3
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
4
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
5
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
6
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
7
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
8
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
9
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
10
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
11
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
12
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
13
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
14
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
15
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
16
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
17
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
18
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
19
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
20
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र

जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये राज्यात प्रिय शहा अव्वल

By admin | Updated: June 13, 2016 05:46 IST

आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट अर्थात जेईईचा (अ‍ॅडव्हान्स) निकाल रविवारी जाहीर झाला

नवी दिल्ली / मुंबई : आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट अर्थात जेईईचा (अ‍ॅडव्हान्स) निकाल रविवारी जाहीर झाला. यात जयपूरचा अमन बंसल याने देशातून तर, मुंबईच्या प्रिय शहा याने राज्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नवी मुंबईचा चिन्मय आवळे याने अनुसूचित जाती वर्गात देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे.जीईई या स्पर्धा परीक्षेतील निकालाच्या आधारावरच आयआयटी आणि अन्य प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. या परीक्षेत यमुनानगरचा भावेश धिंग्रा हा देशात दुसरा तर जयपूरचाच कुणाल गोयल हा तिसऱ्या स्थानी राहिला. मुलींमधून कोटाची रिचा सिंग अव्वल आली आहे. गत २२ मे रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेला १ लाख ५५ हजार ९४८ विद्यार्थी बसले होते. त्यातील केवळ ३६ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ३७२ गुणांची जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा दोन विभागांत घेण्यात येते. मुंबईच्या प्रिय शहाने २८५ गुण मिळवत देशाच्या यादीत सोळावा क्रमांक पटकावला आहे. तर राज्यात मुलींमध्ये पहिली आलेली डिंपल कोचर देशात २९५व्या क्रमांकावर आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>घरचे पाठिशीपालकांच्या पाठिंब्यामुळे चांगले गुण मिळविणे शक्य झाले. बहीण, आई पाठिशी उभ्या राहिल्या. मुंबईत कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरींग करणार. - प्रिय शहा, मुंबई>पुढचे शिक्षण मुंबईतूनचगेल्या दीड वर्षांपासून अभ्यास करत होतो. आजीचे मोठे पाठबळ मिळाले. कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरींग करायचे आहे. आयआयटी मुंबईतूनच पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे.- चिन्मय आवळे, नवी मुंबई