शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरच्या ४७ विकास सोसायट्यांची नोंदणी रद्द

By admin | Updated: April 3, 2017 01:40 IST

नव्याने नोंदणीकृत करण्यात आलेल्या ४७ विविध कार्यकारी विकास सोसायट्यांची नोंदणी उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्या

शिरूर : तालुक्यात नव्याने नोंदणीकृत करण्यात आलेल्या ४७ विविध कार्यकारी विकास सोसायट्यांची नोंदणी उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्या असून, यामुळे विद्यमान आमदारांना हा चांगलाच दणका बसला आहे.आमदार पाचर्णे व बाजार समितीचे सभापती मंगलदास बांदल यांनी तालुक्यात ४७ सोसायट्यांची शासनाकडून नोंदणी करवून घेतली. सरकारने या सोसायट्यांना चुकीच्या पद्धतीने मंजुरी दिल्याच्या विरोधात घोडगंगा कारखान्याचे संचालक दिलीप मोकाशी उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने या सर्व सोसायट्यांची नोंदणी रद्द बातल ठरवली आहे.याबाबत माजी आमदार अ‍ॅड. पवार म्हणाले, आमदार पाचर्णे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत आपला पॅनेलचा पराभव होईल, या भीतीने प्रथम सरकारकडून दबाव आणून निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. शिरूर बाजार समितीबरोबरच बारामती, दौंड, इंदापूर, श्रीगोंदा, पारनेर आदी मदत संपलेल्या बाजार समित्यांची निवडणूक झाली. त्यांचे चेअरमन, व्हा. चेअरमनही निवडण्यात आले. मात्र, शिरूर बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधातही आम्ही मोकाशींच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश देऊन आमदारांना चांगलाच दणका दिल्याचे पवार यांनी सांगितले.दरम्यान, आमदार पाचर्णे यांनी विकास सोसायट्या वाढवून बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान मिळवण्यासाठी ४७ सोसायट्यांची प्रकरणे नोंदणीसाठी सरकारकडे दाखल केली. वैद्यनाथ समितीनुसार ‘एक गाव, एक सोसायटी’ असा नियम असताना नव्याने समिती करून हा नियम रद्द करण्यात आला व सोयीचा जी.आर. काढण्यात आला अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने सोसायट्यांची सरकारने मंजुरी दिल्याचा आरोप अ‍ॅड. पवार यांनी केला. मूळत: आमदार पाचर्णे यांनी हा खटाटोप केवळ पराभवाच्या भीतीने केला. तालुक्यातील सोसायट्यांवर तसेच ग्रामपंचायतीवर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून, आमची निर्विवाद सत्ता येईल याची आमदारांना भीती असल्याने त्यांनी चालवलेला हा केविलवाणा प्रयत्न असल्याची खिल्लीही पवार यांनी उडवली. (वार्ताहर)अ‍ॅड. पवार यांनी सांगितले की, मांडवणगण फराटा येथे चार सोसायट्या असताना तेथे नव्याने तीन, तर आलेगाव पागा येथे अगोदर चार सोसायट्या असताना नव्याने सोसायट्यांची नोंदणी करण्यात आली. अशा प्रकारे सोसायट्यांची संख्या वाढवायची त्याचे संचालक बाजार समितीच्या मतदारयादीत समाविष्ट करायचे हा आमदारांचा डाव असून त्यास न्यायालयाच्या निकालाने चपराक बसली आहे. मे महिन्यात बाजार समितीची निवडणूक होत असून यानिमित्ताने पाचर्णे विरुद्ध पवार असा सामना पुन्हा पहावयास मिळणार आहे.