शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्यात अडकलेल्या डीसीसीत आता कर्मचाऱ्यांचेही पगार वाढीसाठी आंदोलन

By admin | Updated: July 25, 2016 20:39 IST

घोटाळा आणि एका संशयित आरोपीने केलेल्या आत्महत्येमुळे आधीच राज्यभर गाजत असलेल्या डीसीसी बँकेतील कर्मचाऱ्यांनी आता आपल्या मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

ऑनलाइन लोकमतबीड - घोटाळा आणि एका संशयित आरोपीने केलेल्या आत्महत्येमुळे आधीच राज्यभर गाजत असलेल्या डीसीसी बँकेतील कर्मचाऱ्यांनी आता आपल्या मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोमवारपासून सुरू केलेल्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व शाखांचे व्यवहार आज दिवसभर ठप्प राहिले. तीन दिवस हे आंदोलन चालणार असल्याने शेतकऱ्यांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे. तीन दिवसात मागणी मान्य झाली नाही तर कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याची शक्यता असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रताप माने यांनी दिली.गेल्या तीन वर्षापासून डीसीसी बँकेतील कर्मचाऱ्यांना त्यांची वार्षिक वेतनवाढ आणि महागाई भत्ता बँकेच्या संचालक मंडळाने दिलेला नसल्याने वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी हा पवित्रा घेतला आहे. डीसीसी बँकेच्या जिल्ह्यात ५९  शाखा असून यापैकी ५७ शाखांमधून पीक विमा वाटप करण्याचे काम सध्या सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आता पीक वाटपाचे कामही ठप्प झाले आहे. दरम्यान बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सध्या ठेवीदारांचे पैसे देण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याने पगार वाढ करण्यात अडचणी येत असल्याचे सांगून संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव ठेवण्यात येईल, असे सांगितले. दिवसभर जिल्ह्यातील कोणत्याही शाखेत कसलाही व्यवहार झालेला नसल्याने एका दिवसात तीस कोटीचा व्यवहार ठप्प झाल्याची माहिती सूत्रांनी दिली