शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

डीसीसी बँक घोटाळा : धनंजय मुंडे यांना ६ आॅगस्टपर्यंत दिलासा

By admin | Updated: July 22, 2016 18:57 IST

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्जप्रकरणी अंबाजोगाई येथील अपर व सत्र न्या. एन. एस. कोले यांनी शुक्रवारी ६ आॅगस्टपर्यंत

ऑनलाइन लोकमत

बीड, दि. 22  -  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्जप्रकरणी  अंबाजोगाई येथील अपर व सत्र न्या. एन. एस. कोले  यांनी शुक्रवारी ६ आॅगस्टपर्यंत दिलासा दिला आहे. तपासी पोलिस अधिकारी रजेवर गेल्याने जामीन अर्जावर अंतिम निर्णय आता ६ आॅगस्ट रोजी होणार आहे. संत जगमित्र नागा सूतगिरणीच्या बेकायदेशीर कर्जप्रकरणात अंतरिम जामीन मिळावा यासाठी त्यांनी प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे पुत्र अनिकेत निकम यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने तपास अधिकाऱ्याने सुनावणी दरम्यान हजर रहावे, असे आदेश दिले होते. अंबाजोगाई येथील अप्पर पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी तपासी पोलिस अधिकारी रजेवर असल्याचे पत्र न्यायालयाकडे पाठवले होते. जामीन अर्जाची सुनावणी आता ६ आॅगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अ‍ॅड. अशोक कुलकर्णी यांनी बाजू मांडली. सारडा, सोळंके, काळे यांनाही दिलासा...  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात गुरुवारी आ. अमरसिंह पंडित यांना येथील न्यायालयाने विधीमंडळ अधिवेशन संपेपर्यंत अटक करता येणार नाही, असे आदेश दिले होते. पाठोपाठ शुक्रवारी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष सारडा, माजी संचालक शोभा काळे, धैर्यशिल सोळंके यांनाही दिलासा मिळाला. २ आॅगस्टपर्यंत या तिघांना अटक करु नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या तिघांनाही न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले आहेत.