शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

दिवस केक्सचे...

By admin | Updated: December 24, 2016 23:35 IST

ख्रिसमस आणि नववर्षाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सध्या केकशिवाय पर्याय नाही. विविध प्रकारचे केक्स, कुकीज, पेस्ट्रीज सध्या भुरळ पाडत आहेत.

- भक्ती सोमणख्रिसमस आणि नववर्षाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सध्या केकशिवाय पर्याय नाही. विविध प्रकारचे केक्स, कुकीज, पेस्ट्रीज सध्या भुरळ पाडत आहेत.माझ्या घराजवळ बेकरी आहे. गेला महिनाभर त्या मार्गावरून जाताना केक तयार होतानाचा गोड घमघमाट येतोय. ताजा ताजा केक बघून नाही म्हटलं तरी आठवड्यातून एकदा त्या बेकरीकडे पावले वळतातच. पण, आता तर ख्रिसमसच्या दिवसांत असा गोड घमघमाट जवळपास सर्वच बेकरींमधून येतोय. केकचे खरे महत्त्व ख्रिसमसच्या या नाताळाच्या दिवसांत जास्त आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात लोक येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबरला साजरा करू लागले. पुढे या उत्सवाची परंपरा निर्माण झाली. दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिश्चनजगतात अतिशय हर्षोल्हासाने साजरा केला जातो. ख्रिस्तापूर्वी रोम राज्यात २५ डिसेंबरला सूर्यदेव डायनोसियसच्या प्रार्थनेसाठी मोठा उत्सव होत असे. कारण ईश्वराचा पुत्र या दिवशी लोककल्याणासाठी या पृथ्वीवर आला होता. म्हणूनच प्रार्थना, ख्रिसमस गीत कॅरोल्सचे गायन, शुभेच्छा पत्रांचे आदानप्रदान, विविध खाद्यपदार्थ याद्वारे येशूचा जन्मोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करतात. २४ व २५ डिसेंबरच्या दरम्यानची रात्र येशूच्या आराधनेत जागवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळीच जन्मोत्सव साजरा केला जातो. एकमेकांची गळाभेट घेऊन लोक परस्परांना शुभेच्छा देतात. रोट व पवित्र मद्याचा प्रसाद ग्रहण केला जातो. चर्चमध्ये ख्रिसमस ट्री सजविला जातो. लखलखत्या दिव्यांची तोरणे घराघरांना, चर्चेसला लागतात. सध्या साजरा केला जातो तशा पद्धतीचा ख्रिसमस १९व्या शतकात साजरा व्हायला लागला. ख्रिसमस ट्री पूर्वी फक्त जर्मनीत असायचे. ख्रिसमसमध्ये कॅरोल्सचा समावेश ब्रिटनमध्ये प्रिन्स अल्बर्टने केला होता. या दिवशी आतशबाजीची परंपरा टॉम स्मिथने सुरू केली. १८४६मध्ये ख्रिसमर्स कार्ड बनविले गेले. सांताक्लॉजचा उल्लेख १८६८मध्ये एका नियतकालिकात वाचायला मिळतो. २५ डिसेंबर हा दिवस दोन गोष्टींशिवाय अपूर्ण असतो. सांताक्लॉज आणि ख्रिसमस केक. ड्रायफ्रूट्स रममध्ये घालतात आणि ख्रिसमसच्या दिवशी हा मुरलेला मेवा केकच्या मिश्रणात घालतात. हा खास ख्रिसमस केक असतो. पण आता याशिवाय इतरही केकचे प्रकार अगदी सहज मिळायला लागले आहेत. या केक्समध्ये कालानुरूप खूप बदल झाले आहेत. आता वेगवेगळ्या आकार, रंग आणि चवीचे केक मिळतात. तुम्ही फक्त तुम्हाला कशा प्रकारचा केक आणि थीम सांगायची त्याप्रमाणे केक तयार होत आहेत. थोडक्यात, लोकांच्या मागणीनुसार आणि आर्थिक कुवतीनुसार हे केक तयार होत आहेत. याशिवयी केकच्या तज्ज्ञ अमिता कुलकर्णी म्हणाल्या की, केककडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन खूप बदललेला आहे. लोकांना आता विविध प्रकार ट्राय करून पाहायचे असतात. जरी ख्रिसमसच्या दिवसांत प्लम केकला मागणी जास्त असली तरी आता फ्यूजन फ्लेवर्सकडे लोकांचा ओढा वाढला आहे. उदा- रेड वेल्वेटमध्ये आॅरेन्ज आणि डार्क चॉकलेट एकत्र तर रसमलाई केक, गुलाबजामून चीज केक असे हटके प्रकार त्यांना हवे असतात, असे अमिता म्हणाली. सध्या केक्समध्ये फ्रूट केक, त्रिमीशू केक, आयरिश कॉफी, आॅर्गेनिक केक, कप केक असे अनेक प्रकार खूप लोकप्रिय होत आहेत. केक लेयर करून तो जारमध्ये भरून दिला जातो, त्या जार केकची सध्या फॅशन सुरू आहे.खरंतर, केकविषयी कितीही सांगितलं तरी कमीच इतके असंख्य केक्सचे प्रकार जगभरात उपलब्ध आहेत. हे केक्स ओव्हनमध्ये करा नाहीतर कुकरमध्ये. लक्षात राहतो तो त्या केकचा सुगंध आणि चव. केकचे हे प्रेम कुठल्याही मोसमात कायम सोबत असणार यात शंकाच नाही.असा ओळखा फ्रेश केक केक शॉपमध्ये पेस्ट्री, केक आकर्षक रीतीने मांडलेले असतात. त्या वेळी आपल्याला केकची सजावट पाहून नक्की कोणता खावा त्याचा उलगडा होत नाही. केक कापला की त्याचा भाग म्हणजे पेस्ट्री. अनेकदा ती खाल्यानंतर ती फेश, स्पॉन्जी नसल्याचं जाणवतं. महत्त्वाचं म्हणजे साधारण केक हे दोन दिवस चांगले राहतात. त्यामुळे केकची जी पेस्ट्री शाइन करीत असेल, दिसायला ताजी वाटत असेल ती फ्रेश समजावी. दिसताना त्यात थोडा ओलसरपणा जाणवतो. पण तसे दिसले नाही किंवा शंका वाटत असेल तर तर ती पेस्ट्री किंवा केक ताजा नाही असे समजावे.थीम केक्सची चलतीपूर्वी फक्त वाढदिवसापुरताच केक कापण्याची पद्धत होती. पण आता केककडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन पुुरता बदलला आहे. आता थीमनुसार केक तयार होऊ लागले आहेत. वाढदिवसाच्या केकमध्ये तर लहान मुलांच्या आवडत्या कार्टूनपासून ते एखाद्या व्यक्तीच्या आवडीनुसार विविध प्रकारचे केक तयार होत आहेत. याशिवाय साखरपुडा, लग्न, लग्नाचा वाढदिवस, पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम, डोहाळे जेवण अशा कितीतरी गोष्टींसाठी थीम बेस केकची चलती आहे. याबरोबरच सध्या पैठणी आणि त्यावरचे दागिने असा केकही खूप लोकप्रिय आहे. या सर्व केक्सची किंमत साधारण १ हजार रुपयांपासून पुढे सुरू होते.