शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दाऊद इब्राहिम कराचीतच - राजनाथ सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 11:01 IST

दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्येच आहे. असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 -   मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटांचा आरोपी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्येच आहे. कराचीमध्ये त्याचे वास्तव्य असल्याचे आम्हाला माहीत आहे. दाऊद प्रकरणी पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे  केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले. 
मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची मुलाखत प्रख्यात वृत्तनिवेदिका अंजना ओम कश्यप यांनी घेतली. त्यावेळी दाऊद इब्राहिमबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजनाथ सिंग म्हणाले, दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच आहे. तो कराचीत लपलेला असल्याचे आम्हाला माहीत आहे. आम्ही दाऊद इब्राहीमवरून पाकिस्तानवर दबाव आणत आहोत. तसेच त्याच्या मालमत्ताही जप्त करण्यात येत आहेत.  
यावेळी सर्जिकल स्ट्राइक, पाकिस्तानने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना सुनावलेली  मृत्युदंडाची शिक्षा, उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला मोठा विजय, काश्मीर प्रश्न अशा अनेक विषयांवर राजनाथ सिंग यांनी आपले मत मांडले. कुलभूषण जाधव यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न भारत सरकारकडून केले जातील, असे त्यांनी सांगितले. 
"कुलभूषण गुप्तहेर नसून भारताचा नागरिक आहे. त्यांची सुटका केलीच पाहिजे", असं राजनाथ सिंह बोलले आहेत.  कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे असं विचारलं असता, "कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी जे करावं लागेल ते सर्व करणार. पण काहीही करु त्यांना वाचवणार. कुलभूषण जाधव जर गुप्तहेर असते तर त्यांनी भारतीय पासपोर्ट जवळ ठेवला नसता. पाकिस्तानच्या या कृत्याचा भारत निषेध करतो", असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. तसंच हा एक प्री प्लान मर्डर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला आहे. 
"पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायदेशीर नियमांचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानविरोधात आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवू असं सांगत पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी पुर्ण प्रयत्न करणार असल्याचं", सांगत राजनाथ सिंह यांनी भारतीयांना आश्वस्त केलं आहे.
जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवर बोलताना राजनाथ सिंह यांनी "वर्षभरात जम्मू काश्मीरमध्ये बदल झालेला दिसेल", असा विश्वास व्यक्त केला आहे. "फारुख अब्दुल्ला यांनी जवानांवर दगडफेक करणा-यांचं केलेलं समर्थन चुकीचं असून त्यांनी असं करायला नको होतं", असं म्हणत राजनाथ सिंह यांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. दगडफेक करणा-यांवर नियंत्रण आणण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत असं विचारलं असता सरकार आपलं धोरण खुलं करु शकत नाही असं स्पष्ट केलं आहे. 
"लष्करप्रमुखांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना जे कोणी मधे येईल त्यांना परिणाम भोगावे लागतील केलेल्या वक्तव्याशी आपण सहमत असल्याचंही", राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. "संकटाच्या वेळी धाव घेणारे जवान पेलेट गनचा वापर जाणुनबुजून का करतील हा विचार लोकांनी करायला हवा", असं राजनाथ सिंह बोलले आहेत. 
"उत्तरप्रदेशातील विजयावर बोलताना आमचं स्पष्ट बहुमत येईल याचा मला विश्वास होता. पंतप्रधानांनाही मी तसं सांगितलं होतं. पण मला वाटलं होतं जास्तीत जास्त 250 जागा येतील.  325 आकडा आमच्यासाठी अविश्वसनीय होता", अशी कबुली राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली. मुस्लिमांना तिकीट दिलं गेलं नाही असं विचारलं असता, "जो विजयी होईल त्यालाच तिकीट दिलं", असं उत्तर राजनाथ सिंह यांनी दिलं. "कोणता उमेदवार विजयी होईल यादृष्टीने तिकीटवाटप केलं जातं. मुस्लिमांनाही तिकीट दिलं आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मुस्लिमांना तिकीट दिलं आहे", असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
ट्रिपल तलाकवर आमची भूमिका स्पष्ट आहे. कुराणाताही त्याचा उल्लेख नाही. सर्वांसोबत न्याय झाला पाहिजे असं स्पष्टपणे राजनाथ सिंह यांनी सांगितलं. "राम जन्मभूमीचा वाद न्यायालयात आहे, मध्यस्थी करण्याच्या निर्णयाचं स्वागत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांशी बोलून पर्याय काढणार असतील तर त्याचं स्वागत आहे", असंही त्यांनी सांगितलं. 
दाऊद इब्राहिमवर बोलताना राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, "दाऊद इब्राहिमवर एकूण 33 केसेस आहेत. तो कराचीत आहे यामध्ये दुमत नाही. पाकिस्तानवर दबाव आणण्याचा पुर्ण प्रयत्न सुरु आहे". 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले. 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग होता.
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लिक करा
 http://lmoty.lokmat.com/vote.php