शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दाऊद टोळीतील ओपी सिंग खुनातील संशयित निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 21:35 IST

नाशिक : येथील मध्यवर्ती कारागृहात गुन्ह्याची शिक्षा भोगणारा दाऊद टोळीमधील गुन्हेगार ओपी सिंग याची २००२ साली कारागृहात हत्या झाली होती. सदर घटना संपूर्ण राज्यभरात गाजली होती. यावेळी शिक्षा भोगणाºया छोटा राजन टोळीच्या डी. के. रावसह तीन पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकाºयांसह १३ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला ...

नाशिक : येथील मध्यवर्ती कारागृहात गुन्ह्याची शिक्षा भोगणारा दाऊद टोळीमधील गुन्हेगार ओपी सिंग याची २००२ साली कारागृहात हत्या झाली होती. सदर घटना संपूर्ण राज्यभरात गाजली होती. यावेळी शिक्षा भोगणाºया छोटा राजन टोळीच्या डी. के. रावसह तीन पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकाºयांसह १३ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. यावर गुरुवारी (दि.१७) सुनावणी होऊन न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी संशयित आरोपींना निर्दोष ठरविले.नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील बॅरेक क्रमांक सहाच्या आंघोळीच्या हौदावर २४ नाव्हेंबर २००२ साली दुपारी पावणे तीन ते पावणे चार वाजेच्या दरम्यान ओपी सिंग हौदावर बसलेला असताना त्याचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात राजन टोळीशी संबंध असणारा रविमल्लेश बोरा उर्फ डी. के. राव, निरंजन काशीनाथ शाहू उर्फ बिल्डर, श्रीपाद दिनकर पराडकर, श्रीपाद दिनकर पराडकर, फिरोज उर्फ बशीर खान, शरद प्रकाश दावकर, सुरेश कुटीयनेत, बाळा उर्फ मंगेश नारायण परब, तरप्पा गगनसिंग नेपाळी, चंद्रकांत खोत, बन्या लिंगेरी, सुनील उर्फ मंग्या काकडे, सुरेश उर्फ चंद्रा गुंडप्पा पुजारी, प्रवीण उर्फ मम्म्या थोरात (सर्व रा.मुंबई) हे संशयित आरोपी होते. तसेच मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग अधिकारी शरद शिवाजी शेळके, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंग अधिकारी जयवंत अर्जुनराव शिंदे, भरत बाबूराव म्हस्कर, कारागृहाच्या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र नामदेव काळे यांचाही ओपी सिंग हत्येच्या कटात सहभाग व गुन्ह्यासाठी मदत केल्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून सहभाग होता. अशा या गाजलेल्या खटल्यावर महत्त्वपूर्ण सुनावणी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. आर. शर्मा यांनी सबळ पुराव्याअभावी संशयित आरोपींना या गुन्ह्यात निर्दोष ठरविले. यावेळी न्यायालयाने एकूण चौदा साक्षीदार तपासले. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. तळेकर यांनी बाजू मांडली, तर संशयित राव व खान यांच्या वतीने अ‍ॅड. श्रीधर माने यांनी युक्तिवाद केला. एकूण १७ संशयित आरोपींपैकी सहा संशयितांचा मृत्यू झाला असून नेपाळी, लिंगेरी, काकडे हे पोलीस एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. तसेच शाहू, पुजारी व थोरात हे जामीन मिळाल्यानंतर बेपत्ता झाले आहेत.