शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदच्या प्रॉपर्टीचा आज लिलाव

By admin | Updated: December 9, 2015 09:19 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईस्थित दोन हॉटेलचा बुधवारी जाहीर लिलाव केला जाणार आहे.

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईस्थित दोन हॉटेलचा बुधवारी जाहीर लिलाव केला जाणार आहे. त्यासाठी तिघांनी तयारी दर्शविली असली, तरी प्रत्यक्ष लिलावावेळी किती उपस्थित राहतात आणि खरोखर बोली लावली जाते का? हे पाहाणे महत्त्वाचे आहे. परळ येथील एका हॉटेलमध्ये सकाळी अकरा वाजता लिलाव प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. जाहीर लिलावासाठी ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन, दिल्लीतील व्यावसायिक अजय श्रीवास्तव व आणखी एका व्यक्तीने तयारी दर्शविली आहे. यापैकी बालाकृष्णन यांना दाऊदचा हस्तक छोटा शकीलकडून धमकाविण्यात आल्याने प्रत्यक्षात किती जण लिलावावेळी उपस्थित राहतात, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था व योग्य खबरदारी घेतली जाणार आहे.मुंबई बॉम्बस्फोटानंतर फरार असलेल्या मोस्ट वॉण्टेड दाऊदच्या मुंबई व देशभरातील मालमत्ता केंद्र सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. त्याची दहशत संपविण्यासाठी या प्रॉपर्टी लिलावाद्वारे विकण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. खासगी कंपन्यांकडे त्याबाबत जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार, भेंडी बाजार येथील पाखमोडिया स्ट्रीटजवळ असलेल्या हॉटेल दिल्ली जायका आणि रौनक अफरोज या हॉटेलचा ९ डिसेंबरला जाहीर लिलाव करण्याचे निश्चित केले आहेत. लिलावासाठी आॅनलाइन बुकिंग करण्यात आले आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत ३ जणांनी नोंदणी केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. हॉटेलच्या बोलीसाठी किमान ३० लाखांपासून बोलीची सुरुवात केली जाणार आहे. साधारणपणे सव्वा कोटीपर्यंत त्याचा दर मिळावा, असे शासनाचे प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी) > जेष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी या लिलावामध्ये सहभाग घेण्याची तयारी दर्शविल्यानंतर शुक्रवारी त्यांना छोटा शकीलकडून धमकाविण्यात आले आहे. मात्र, त्यांनी त्याला न घाबरता माघार घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. ही प्रॉपर्टी मिळाल्यास त्याचा वापर सामाजिक कार्यात विशेषत: गरीब मुले आणि महिलांच्या मदतीसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.