शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दाऊद फोन कॉल प्रकरण - खडसे पुन्हा अडचणीत

By admin | Updated: May 29, 2016 11:24 IST

दाऊद इब्राहिमच्या घरातून महसूलमंत्री खडसे यांना फोन आल्याच्या प्रकरणाला आज नवीन वळण मिळाले आहे. सायबर हॅकर मनीष भंगाले यांनी खडसे विरोद्धात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि, २९ : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या घरातून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना फोन आल्याच्या प्रकरणाला आज नवीन वळण मिळाले आहे. सायबर हॅकर मनीष भंगाले यांनी खडसे विरोद्धात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्याने खडसे यांना आलेल्या फोनकॉल्स डिटेल्सची सीबीआयमार्फात चौकशी करण्यात यावी अशी प्रमुख मागणी केली आहे. त्यामुळे दाऊद फोन कॉलप्रकरणात खडसे यांची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे. 
 
दरम्यान, यापुर्वीचं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या घरातून फोन आल्याच्या प्रकरणात महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने क्लीनचीट दिलेला आहे. सप्टेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत ९४२३०७३६६७ या क्रमांकावर कोणताही कॉल आला नाही. तसेच या क्रमांकावरून कोणताही कॉल करण्यात आलेला नसल्याचे मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले होते.
 
काय आहे प्रकरण - 
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबीन हिच्या नावे असलेल्या दूरध्वनीवरून एकनाथ खडसेंना फोन आले होते असा आरोप आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केला होता. मेनन यांचे हे आरोप महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी फेटाळून लावले. मात्र आपल्या आरोपांचा पुनरुच्चार करताना प्रीती मेनन यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत खडसे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. मेनन यांनी आरोप केले असले तरी तशी तक्रार आपणाकडे केलेली नाही, असे जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.
 
दाऊदच्या कराची येथील पत्त्यावर नमूद असलेल्या चार विविध दूरध्वनी क्रमांकांवरून ५ सप्टेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या काळात खडसे यांना कॉल आले, असा आरोप करताना प्रीती मेनन यांनी संबंधित कागदपत्रांचा हवाला दिला आणि खडसे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही मेनन यांनी केली. मनीष लीलाधर भंगाळे या जळगावच्या तरुणाने पाकिस्तानी दूरसंचार कंपनीचे संकेतस्थळ हॅक करून ही माहिती काढल्याचे त्यांनी सांगितले.
हॅकिंगच्या माध्यमातून ५ सप्टेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या कालावधीत ही माहिती काढण्यात आली. त्यानुसार, या प्रकरणात ५ पाच भारतीय क्रमांकांचा समावेश असल्याची माहिती उघडकीस आली. त्यात महाराष्ट्रातील महसूल मंत्री खडसे यांच्या मोबाइल क्रमांकाच्या समावेश आहे. याप्रकरणी, अधिक चौकशी करण्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याचे प्रीती मेनन यांनी सांगितले. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत खडसे यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी मेनन यांनी केली.
 
विशेष म्हणजे प्रीती मेनन यांची पत्रकार परिषद संपताच मनीष भंगाळे याने त्याच ठिकाणी पत्रकार परिषद घेत खडसे यांना दाऊदच्या घरातून फोन केले गेले असा आरोप केला. कोणत्याही राजकीय पक्षाशी आपला संबंध नसल्याने मी स्वतंत्रपणे माहिती देत असून मला याबाबत अनेकांकडून ऑफर आल्या तसेच ठार मारण्याच्या धमक्या आल्या आहेत, असे भंगाळे याने सांगितले.तर हॅकिंग प्रक्रियेत आयडिया कंपनी, पाकिस्तान टेलिकॉम कंपनीच्या डेटातून या कॉलची माहिती मिळाली. शिवाय, याकरिता खास दोन-तीनवेळा दुबईला जाऊन आलो, असेही भंगाळे याने सांगितले.
 
मोबाइल क्रमांक वापरात नाही - खडसे
आरोप फेटाळताना खडसे म्हणाले, ९४२३०७३६६७ या आपल्या मोबाइल क्रमांकाचा उल्लेख केला आहे, तो गेल्या एक वर्षापासून वापरात नाही. या क्रमांकावर या काळात आंतरराष्ट्रीय कॉल आलेला नाही किंवा त्यावरून कॉल परदेशात केलेला नाही. संबंधित कंपनीने तसे लेखी कळविले आहे. हा मोबाइल क्रमांक क्लोन करून तो वापरला गेला असण्याची शक्यता आहे. याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी मीच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
 
पाकमधील या क्रमांकावरून खडसेंना फोन ?
दाऊदच्या पत्नीच्या नावे असलेल्या विविध दूरध्वनी क्रमांकांवरून खडसे यांच्या नावे असलेल्या मोबाइलवर संपर्क साधण्यात आल्याचा आरोप आहे. ते दूरध्वनी क्रमांक असे : ०२१-३५८७१६३९, ०२१-३५८७१७१९, ०२१-३५८७१८३९, ०२१-३५३६०३६०