दौंड। दि.८ (वार्ताहर)दौंड येथे दलित बांधवांचा मोर्चा शांततेत झाला. यावेळी शासनाच्या तसेच दलितांवर अन्याय करणार्यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात येत होत्या. राज्यात दलितांवर होणार्या वाढत्या अन्यायाच्या निषेधार्थ सर्व दलित संघटनांचे कार्यकर्ते हातात निळे झेंडे घेऊन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एकत्रित आले. या मोर्चा दलित बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते. शहरातील मुख्य रस्त्यावरुन हा मोर्चा तहसील कचेरीजवळ आला. त्यानंतर मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी दलितांवर अन्याय करणार्यांच्या निषेधार्थ अनेकांनी भाषणे केली. भास्करराव सोनवणे, नगरसेवक अनिल साळवे, नगरसेविका शितल मोरे, जयश्री जाधव, आबा वाघमारे, प्रा. भिमराव मोरे, भारत सरोदे, मच्छिंद्र डंेगळे, संजय कांबळे, अश्विन वाघमारे, गौतम गायकवाड, राजेंद्र खटी, श्रीकांत थोरात रामभाऊ ठाणेदार, ॲड. राजेभोसले, धरम गायकवाड, रमेश चावरिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सभेचे सूत्रसंचालन राजेश मंथने, विकास कदम यांनी केले तर आभार नरेश डाळिंबे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने दलित बांधव उपस्थित होते. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थीबाबत धार्मिक भावना दु:खावणार्या आमदार रामदास कदम यांना अटक करण्यात यावी, जामखेड-खर्डा (जि. अहमदनगर) येथील किशोरवयीन मुलावर अत्याचार करुन त्याची निर्घुण हत्या करणार्यांना फाशी देण्यात यावी, अहमदनगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावा, यासह अन्यकाही मागण्या दलित बांधवांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
दौंडला दलित बांधवांचा मोर्चा श्
By admin | Updated: May 8, 2014 22:34 IST