शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दौंड, बारामतीत वादळी तांडव

By admin | Updated: May 20, 2016 01:57 IST

तालुक्यात विजेच्या कडकडाटासह काही भागात वादळी पाऊस झाला.

दौंड : तालुक्यात विजेच्या कडकडाटासह काही भागात वादळी पाऊस झाला. वादळाच्या तांडवाने शाळा आणि घरांच्या छपरांचे पत्रे उडून गेले तर विद्युत खांब आणि विद्युत तारांच्या पडझडीसह अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेळ्या आणि जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. एकंदरीतच अवघ्या १५ मिनिटांत लाखोंचे नुकसान झाले आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास सर्वत्र ढग भरून आले होते. साडेचार ते पाच या वेळेत पावसाचा शिडकावा झाला. मात्र पाचनंतर विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने थैमान घातले. दौंड शहरात सुमारे २० मिनिटे जोरदार पाऊस होऊन रेल्वे कुरकुंभ मोरीत पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली. शहरातही अन्य ठिकाणी पाणी साचलेले होते. नेहमीप्रमाणे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. गोपाळवाडी (ता. दौंड) या भागात जिजामाता शाळेच्या दोन खोल्यांचे तसेच गिरीमजवळ सिटी इंटरनॅशनल स्कूलच्या शाळेचे पत्रे उडाले.बेटवाडी, होलेमळा येथे घरांचे पत्रे उडून विद्युततारा तुटल्याने या भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला. कुरुळेवस्ती येथे वादळी वाऱ्याने चार शेळ्या दगावल्याची माहिती पुढे आली आहे. याचबरोबरीने ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांची जनावरे देखील मृत्यूमुखी पडले असल्याचे बोलले जाते. (वार्ताहर)भांडगाव येथे विजांच्या कडकडाटसह झालेल्या मान्सून पूर्व पावसात वीज पडून एका शेतकऱ्याचा व गाईचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१९) रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास येथील शेरीचा मळा येथे घडली. पोपट बाबुराव बोरकर (वय, ५५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. पोपट बोरकर हे सायंकाळच्या सुमारास जोराचा वारा सुटल्याने त्यांची गाय गोठ्यात बांधण्यासाठी गेले होते.दरम्यान जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होता. रिमझिम पाऊस देखील येऊ लागला होता. परंतु गोठ्यात गाई बांधत असतानाच वीज पडून पोपट बोरकर व त्यांच्या गाईचा मृत्यु झाला. सदर घटना समजताच तातडीने त्यांना यवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. .