शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीचे लग्न; वडिलांची आत्महत्या

By admin | Updated: May 1, 2017 02:27 IST

विऱ्हाम येथील मुलीचे लग्न अवघ्या चार दिवसांवर आलेले असताना बापाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची

पाईट : विऱ्हाम येथील मुलीचे लग्न अवघ्या चार दिवसांवर आलेले असताना बापाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या केली असावी, अशी गावामध्ये कुजबुज आहे. याबाबत खेड पोलीस चौकीमध्ये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.विऱ्हाम येथील मारुती चिमाजी सावंत (वय ६२) यांनी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान शेतातील मोहाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत गणपत चिमाजी सावंत (रा. विऱ्हाम, ता. खेड) यांनी खेड पोलीस चौकीत खबर दिली.याबाबत ठाणे अंमलदार एस. एन. नाडेकर यांनी माहिती देताना सांगितले, की ते व त्यांच्या कुटुंबातीलइतर राजगुरुनगर येथे लग्नासाठी आलेले असताना गावातील माजी उपसरपंच सिद्धार्थ रोकडे यांनी फोन करून तुमचा भाऊ मारुती सावंत याने तुमच्या शेतात मोहाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर ते त्वरित गावाला जाऊन पाहिले असता भावाने शेतातील मोहाच्या झाडाला दोरी गळ्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पाहिले. याबाबत मृताच्या आसपास इतर काहीही आढळून आले नाही.मृत मारुती चिमाजी सावंत (वय ६२) यांना ८ मुली असून त्यामधील ५ नंबरच्या मुलीचे लग्न गुरुवारी (दि. ४ मे) गावामधील एका विवाह सोहळ्यामध्ये करण्याचे ठरले होते. लग्न अवघ्या चार दिवसांवर आलेले असताना वडिलांनी आत्महत्या केल्याने गावावर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांनी कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या केली असावी, असा नात्यातील व गावामधील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.मारुती सावंत यांची घरची स्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांच्यावर भलवडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज आहे. त्यांच्याकडून मार्चअखेर परतफेड झाली नसल्याचे समजते. कर्जफेडीची विवंचना व डोक्यावर आलेले मुलीचे लग्न यांच्यामुळेच भावकीतील लग्नाला सर्व गेल्याने घरी कोणी नसताना आत्महत्या केली.या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस हवालदार बी. एल. गिरजे अधिक तपास करीत आहेत.