शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

2 वर्षाच्या चिमुरडीसमोर वडिलांकडून आईची हत्या

By admin | Updated: June 20, 2016 08:51 IST

आपल्या 2 वर्षाच्या चिमुरडीसमोरच अशोक लखनलाल सुरा याने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

ऑनलाइन लोकमत - 
जालना, दि. 20 -  आपल्या 2 वर्षाच्या चिमुरडीसमोरच अशोक लखनलाल सुरा याने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर अशोक सुरा स्वत: पोलिसांसमोर हजर झाला आणि आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला असून अशोका सुराला अटक केली आहे. 
 
अशोक सुरा याची पत्नी पूजासोबत नेहमी भांडणं होत असे. पूजा छोट्या छोट्या गोंष्टींवरुन माझ्याशी भांडायची, मला त्रास द्यायची त्यामुळे आपण हत्या केल्याची कबुली अशोक सुराने दिली आहे. अशोक आणि पूजाचं सहा वर्षापुर्वी लग्न झालं होतं. त्यांना दोन मुली आहेत. एक पाच वर्षाची असून दुसरी दोन वर्षाची आहे.
 
अशोक सुरा पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. 
 
'हे दांपत्य एकत्र कुटुंबात राहत होतं. आरोपी अशोक सुरा दारुच्या आहारी गेला होता. पत्नीची हत्या केली त्यादिवशी त्याने तिच्या तोंडात कापडाचा गोळा भरला होता, जेणेकरुन तिचा आवाज बाहेर जाऊ नये. हल्ल्याच्या दरम्यान पूजाने स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तिच्यावर चाकूने वार करण्यात आले, ज्यामधील एक वार तिच्या गळ्यावर करण्यात आला. पूजाने मदतीसाठी केलेली याचना कोणाला ऐकू जाऊ नये यासाठी त्याने टिव्हीचा आवाजही वाढवून ठेवला होता', अशी माहिती पोलीस उप-निरीक्षक जयसिंग परदेशी यांनी दिली आहे. 
 
हत्या केल्यानंतर आरोपी अशोक सुरा पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी निघाला. त्यावेळी त्याची दोन वर्षाची मुलगी जिने हा सर्व प्रकार स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली ती आजीकडे धावत गेली आणि सगळी घटना सांगितली. पोलिसांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून आरोपीला अटक केली आहे.