शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दत्तवाडमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त

By admin | Updated: July 11, 2015 01:37 IST

चौघे ताब्यात : मिरजेत ३४ लाखांच्या नोटा जप्त; सांगली पोलिसांची कारवाई

सांगली/कुरुंदवाड : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी मिरजेत सुमारे ३४ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या नोटा छपाईचा कारखाना दत्तवाड (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथे असल्याचे समजताच पथकाने लागलीच तेथेही छापा टाकला. तेथून स्कॅनर, प्रिंटर, रंगीत झेरॉक्स यंत्र, कटिंग यंत्र व कागदी बंडल जप्त केले. नोटांची छपाई करून त्या चलनात आणणाऱ्या दत्तवाडमधील बाप-लेकासह चौघांच्या टोळीस ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. रमेश कृष्णा घोरपडे, ऐनुद्दीन गुलाब ढालाईत, इम्रान ऐनुद्दीन ढालाईत व सुभाष शिवलिंग पाटील-सोळकुडे (सर्व रा. दत्तवाड) यांचा समावेश आहे. ऐनुद्दीन ढालाईत शुक्रवारी सायंकाळी मिरजेतील स्टेशन रस्त्यावरील हैदराबाद बँकसमोर एकाला बनावट नोटा खपविण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. या विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने बँकेजवळ सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार संशयित ढालाईत आला. त्याच्या हातात बॅग होती. त्याला ताब्यात घेण्यासाठी पथक पुढे गेले. पोलीस असल्याची चाहूल लागताच त्याने बॅग टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्पूर्वीच त्याला पकडले. बॅगेची झडती घेतल्यानंतर यामध्ये सुमारे ३४ लाखांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या सर्व नोटा एक हजाराच्या आहेत. ढालाईतची कसून चौकशी केल्यानंतर त्याने नोटा छपाईचा कारखाना दत्तवाडमध्ये रमेश घोरपडे याच्या घरात असल्याचे सांगितले. पथकाने संशयित ढालाईत यास घेऊन दत्तवाड गाठले. रमेश घोरपडे याच्या कौलारू घरावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी रमेश घोरपडे, इम्रान ढालाईत, सुभाष पाटील हे तिघेही चौघे नोटांची छपाई करताना रंगेहात सापडले. येथे नोटा छपाईसाठी वापरण्यात आलेले स्कॅनर, प्रिंटर, रंगीत झेरॉक्स यंत्र व नोटांची छपाई केल्यानंतर कटिंग करण्यासाठी ठेवलेले यंत्र सापडल्याने ही सर्व यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. कोऱ्या कागदांचे बंडल व तसेच नोटांच्या आकाराचे कापून ठेवलेले बंडलही मोठ्या प्रमाणात सापडले. मात्र छपाई केलेली एकही नोट तेथे सापडली नसल्याचे निरीक्षक घनवट यांनी सांगितले. अन्य तिघा संशयितांच्या घरावर छापे टाकून पथकाने झडती घेतली. मात्र, काहीही संशयास्पद सापडले नाही.जप्त करण्यात आलेल्या यंत्रसामग्रीपैकी नोटा छपाईचे कटिंग यंत्र वजनाने प्रचंड आहे. ते पोलिसांनी मालवाहू वाहनातून आणले. ते उतरून घेण्यासाठी दहा ते पंधरा पोलिसांची मदत घ्यावी लागली. रंगीत झेराक्स यंत्रही आकाराने मोठे असल्याने तेही मालूवाहू रिक्षातून आणण्यात आले. बँकेतही बनावट नोटायाप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक राजन मल्हारी चव्हाण यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. मे महिन्यात युनियन बँकेकडून चार जिल्ह्यांतील बँकांकडून आलेली ७ कोटी २१ लाख रुपये रक्कम रिझर्व्ह बँकेच्या बेलापूर कार्यालयात पाठविली होती. यापैकी हजार, पाचशे रूपयाच्या दोन व शंभराच्या सहा अशा ३६00 किमतीच्या नोटा सापडल्या.पथक कर्नाटकातताब्यात घेतलेल्या संशयितांचे बनावट नोटा चलनात आणण्यासाठी कर्नाटकात ‘कनेक्शन’ असल्याची माहिती मिळाल्याने पथक रात्रीच कर्नाटकात रवाना झाले आहे. तेथील पोलिसांच्या मदतीने त्यांनी छापे टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. संशयितांना शनिवारी सकाळी अटक करून दुपारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. ते कधीपासून नोटांची छपाई करतात, आतापर्यंत त्यांनी कोठे-कोठे चलनात आणल्या, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे निरीक्षक घनवट यांनी सांगितले.ग्रामपंचायत उमेदवाराचा समावेशऐनुद्दीन ढालाईत याने दत्तवाड येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग तीनमधून अर्ज भरला आहे. त्याने प्रचारही सुरू केला होता. शुक्रवारी दुपारी प्रचारादरम्यान त्याने अनेकांना ‘तुमची घरपट्टी व पाणीपट्टी मी स्वत: भरतो, पण मला निवडून द्या’, असे आवाहन केले होते. त्यानंतर तो नोटा घेऊन त्या खपविण्यासाठी मिरजेतला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याचा भेळ विक्रीचा व्यवसाय असल्याचे समजते. छोट्या घरात नोटांची छपाई गावातील भरवस्तीत छोट्याशा घरात या नोटांची छपाई केली जात होती. स्टेशनरीच्या उत्पादनाचे काम करीत असल्याचे नागरिकांना भासवत असे. त्यामुळे ग्रामस्थ याकडे लक्ष देत नसत. पोलिसांच्या या कारवाईने ग्रामस्थांना सत्य माहिती पुढे आली असून, बऱ्याच दिवसांपासून ही छपाई होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.आरोपींची स्थिती बेताचीबनावट नोटा प्रकरणातील संशयित आरोपी चौघेही एकमेकांचे कट्टर मित्र आहेत. सर्वांची आर्थिक परिस्थितीही बेताचीच आहे. रमेश दुसऱ्याची शेती करतो, सुभाष शेतकरी आहे, तर ऐनुद्दीन व इम्रान हे पितापुत्र असून, भेळगाडी चालवितात.