शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

दत्ता खानविलकर अनंतात विलीन

By admin | Updated: November 28, 2014 22:39 IST

यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री अॅड. दत्ताजीराव खानविलकर (9क्) यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने त्यांच्या येथील राहत्या घरी निधन झाले.

अलिबाग : मनमिळावू स्वभाव, देखणो व्यक्तिमत्त्व, निष्णात फौजदारी वकील आणि कला, समाजकारण व राजकारण यांच्या जोरावर तब्बल 65 वर्षे जनसामान्यांशी पक्की नाळ जुळलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री अॅड. दत्ताजीराव खानविलकर (9क्) यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने त्यांच्या येथील राहत्या घरी निधन झाले. 
अॅड. खानविलकर यांच्या निधनाचे वृत्त येताच जिल्ह्यातील सर्वपक्षीय व समाजातील सर्व स्तरातील लोकांनी अलिबागकडे येण्यास प्रारंभ केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अॅड. खानविलकर यांचे अंत्यसंस्कार संपूर्ण शासकीय इतमामात करण्याचे आादेश रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांना दिले.
आजन्म पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे खानविलकर यांच्या इच्छेनुसार, पारंपरिक प्रथांचा अवलंब न करता त्यांचे चिरंजीव अजित खानविलकर यांनी भडाग्नी देवून अंत्यविधी केला. खानविलकर यांच्या निवासस्थानी रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी शासनाच्या वतीने आदरांजली वाहिल्यावर रायगड पोलिसांच्या विशेष सशस्त्र पथकाने मानवंदना दिली.
अंत्ययात्र अलिबाग शहरातून जाताना ठिकठिकाणी खानविलकर यांच्या चाहत्यांनी त्यांना पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली. अलिबागच्या नगराध्यक्षपदी तब्बल 12 वर्षे विराजमान राहून अलिबागचा कायापालट करणारे माजी नगराध्यक्ष खानविलकर यांच्या पार्थिवावर अलिबाग नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीसमोर अलिबागकरांच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.
अलिबागेत उत्स्फूर्त बंद
4अॅड.खानविलकर यांची सर्व राजकीय पक्ष आणि जनसामान्यांत प्रचंड लोकप्रियता होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने चटका लागलेल्या अलिबाग शहरातील सर्व व्यापा:यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणो बंद पाळून श्रद्धांजली अर्पण केली. शहरातील कोकण एज्युकेशन सोयायटी व जनता शिक्षण मंडळाने आपल्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देवून आदरांजली अर्पण केली.
4आमदार पंडित पाटील, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सुनील तटकरे, माजीमंत्री रवीशेठ पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नमिता नाईक, कोएसोचे अध्यक्ष संजय पाटील आदींनी अंत्यदर्शन घेतले.