शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांच्या रिक्त पदांमुळे ‘मॅट’मध्ये तारीख-पे-तारीख

By admin | Updated: October 31, 2016 04:40 IST

उपाध्यक्ष, न्यायिक सदस्य, प्रशासकीय सदस्य यांच्या जागा रिक्त असल्याने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) गेल्या कित्येक महिन्यांपासून तारीख-पे-तारीख सुरू आहे.

यवतमाळ : उपाध्यक्ष, न्यायिक सदस्य, प्रशासकीय सदस्य यांच्या जागा रिक्त असल्याने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) गेल्या कित्येक महिन्यांपासून तारीख-पे-तारीख सुरू आहे. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची शेकडो प्रकरणे न्यायाच्या प्रतीक्षेत तेथे प्रलंबित आहेत. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाचे मुख्य पीठ मुंबईत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि दोन सदस्य अशी त्याची रचना आहे. परंतु तेथील एक सदस्य रमेशकुमार हे सप्टेंबर २०१५ मध्ये निवृत्त झाले. परंतु तेव्हापासून प्रशासकीय सदस्याची ही जागा रिक्त आहे. ‘मॅट’चे औरंगाबाद व नागपूरमध्ये खंडपीठ आहे. उपाध्यक्ष आणि दोन सदस्य (न्यायिक, प्रशासकीय) अशी या खंडपीठाची रचना आहे. नागपुरातील त्यामुळे गिलाणी व मुजुमदार हे निवृत्त झाल्याने हिंगणे या एकमेव न्यायिक सदस्यांवर कामकाज सुरू आहे. अन्य दोन जागा रिक्त आहेत. औरंगाबादचीसुद्धा स्थिती अशीच आहे. तेथे जे. डी. कुलकर्णी हे एकमेव सदस्य आहेत. रिक्त असलेल्या दोन जागा भरल्या गेलेल्या नाहीत. ‘मॅट’च्या या तीनही न्यायालयांमध्ये अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. त्याची संख्या औरंगाबादमध्ये अधिक असल्याचे सांगितले जाते. तात्काळ न्याय मिळेल या आशेने ‘मॅट’मध्ये धाव घेणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना कित्येक महिन्यांपासून ‘तारीख-पे- तारीख’ सुरू आहे. औरंगाबादमध्ये मुंबईहून न्यायिक सदस्यांना सतत पाठविले जात असल्याने मुंबईच्या कामातही अडथळे निर्माण होत असल्याचे विधी सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी) >पोलिसांची याचिका चार वर्षांपासून प्रलंबिततहसीलदारांच्या धर्तीवर पोलीस निरीक्षकांनाही सहाव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन मिळावे, अशी विनंती करणारी याचिका नागपुरातील १२ पोलीस निरीक्षकांनी ‘मॅट’मध्ये सन २०१३ मध्ये दाखल केली होती. परंतु गेल्या चार वर्षांत त्यावर न्याय मिळू शकला नाही.