शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

दर्शन पुजारीचे दुहेरी अजिंक्यपद

By admin | Updated: June 13, 2016 21:05 IST

पुण्याच्या दर्शन पुजारीने सांगलीच्या तेजस शिंदेचा २-० असा धुव्वा उडवत पहिल्या महाराष्ट्र सब-ज्युनिअर राज्य निवड बॅडमिंटन स्पर्धेच्या १३ वर्षांखालील एकेरी गटात अजिंक्यपदावर नाव कोरले.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १३ : पुण्याच्या दर्शन पुजारीने सांगलीच्या तेजस शिंदेचा २-० असा धुव्वा उडवत पहिल्या महाराष्ट्र सब-ज्युनिअर राज्य निवड बॅडमिंटन स्पर्धेच्या १३ वर्षांखालील एकेरी गटात अजिंक्यपदावर नाव कोरले. तर दुहेरी गटात अटीतटीच्या झालेल्या सामन्यात दर्शनने रायगडच्या शैलेश सिंगच्या साथीने विजयाची नोंद करत स्पर्धेत दुहेरी अजिंक्यपद मिळवण्याचा मान पटकावला.जयेश धुरी बॅडमिंटन फाऊं डेशन आणि बृहन्मुंबई क्रीडा व ललितकला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले होते. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना आणि मुंबई उपनगर जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने मुलूंड पश्चिमेतील कालिदास क्रीडा संकुलात स्पर्धेचे सामने उत्साहात पार पडले.स्पर्धेत ११ वर्षीय दर्शनने तेजस विरु्दध खेळताना धमाकेदार सरुवात केली. शिस्तबद्ध ेखेळ आणि निवडक फटकेबाजी यांचा योग्य समन्वय साधत दर्शनने सामन्यावर आपली पकड मिळवली. पहिल्या सेटमध्ये तेजसने काहीअंशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र दर्शनपुढे त्याचा निभाव लागला नाही. अखेर २१-१५, २१-११ अशा दोन्ही सेटमध्ये निर्विवाद वर्चस्व राखत दर्शनने विजय मिळवला.दुहेरीत दर्शनने शैलेश सिंगच्या साथीने पुण्याच्या अरविदं राव-विवेक हब्बुविरुद्ध खेळण्यास सुरुवात केली. अटीतटीच्या झालेल्या लढतीत दर्शन-शैलेश जोडीने प्रतिस्पर्धी जोडीचा विशिष्ट व्युहरचनेच्या आधारे खेळताना पहिल्या सेटमध्ये २१-१८ असा पराभव केला. दुसऱ्या सेटमध्ये देखील दर्शन-शैलेश जोडीने आपला करिष्मा कायम ठेवत २१-१७ अशा विजयाची नोंद केली. (क्रीडा प्रतिनिधी)

अन्य निकाल एकेरी गट१३ वर्षांखालील मुली: तारा शाह (पुणे) वि.वि. हिृशा दुबे (बृहन्मुंबई) १७-२१, २१-११, २१-०८.१५ वर्षांखालील मुली : सई नांदूरकर (नाशिक) वि.वि. आर्या देशपांडे (सातारा) २१-१६, १९-२१, २१-१५.१५ वर्षांखालील मुले : सुधांशू भुरे (नागपूर) वि.वि. रोहन ठूल (ठाणे) १६-२१, २२-२०, २१-०९ दुहेरी गट१३ वर्षांखालील गट मुली : रिया हब्बू-साहन्या कुलकर्णी (पुणे) वि.वि. हिृशा दुबे-खुशी कुमारी(बृहन्मुंबई) २५-२३, १८-२१, २१-१४.१५ वर्षांखालील मुली :जान्हवी जगताप (मुंबई)-तनिष्का देशपांडे(पुणे) वि.वि. आर्या आंचलवार-लिवीया फर्नांडिस (नागपूर) २१-१२, २१-०६१५ वर्षांखालील मुले : राहुल काने-रोहन ठूल (ठाणे) वि.वि. पार्थ घुबे (पुणे)-सुधांशू भुरे(नागपूर)२१-१८, २१-१६................................