शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

किराणा-भाजीपाल्यासाठी पोलीस दावणीला!

By admin | Updated: November 1, 2015 00:27 IST

जनतेची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे आदी पोलिसांची कर्तव्ये असली, तरी अनेक कर्मचाऱ्यांचा वापर मात्र अधिकाऱ्यांच्या बंगल्यावरील

यवतमाळ : जनतेची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे आदी पोलिसांची कर्तव्ये असली, तरी अनेक कर्मचाऱ्यांचा वापर मात्र अधिकाऱ्यांच्या बंगल्यावरील घरगुती कामांसाठी केला जातो. किराणा, दळण, भाजीपाला, मुलांची ने-आण करण्यासाठी त्यांना जुंपले जाते. राज्यातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट महासंचालकांच्या दरबारात याबाबत निवेदन-पत्राद्वारे तक्रार केली आहे.राज्यातून आलेल्या पत्रांची दखल घेऊन महासंचालकांतर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) आशुतोष डुम्बरे (मुंबई) यांनी ‘पोलीस अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारी’ असा संदर्भ देऊन विभागाच्या पोलीस प्रमुखांनी कर्मचाऱ्यांच्या शंका निरसनासाठी पोलीस दरबार भरविण्याच्या सूचना केल्या आहेत. समस्या ऐकून त्याचे घेऊन निरसन करण्याचे व योग्य मार्गदर्शन करण्याचे सुचविले आहे.जळगावचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सादरेंच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस दलात वरिष्ठांकडून अधिकारांचा गैरवापर होतो. कर्मचाऱ्यांना नोकरासारखे वागविले जाते. घरगुती, वैयक्तिक कामे करून घेतली जातात. किराणा, भाजीपाला आणणे, पत्नीला ब्युटीपार्लर तसेच सिनेमाला नेऊन सोडणे, मुलांना शाळेत, शिकवणीला नेणे-आणणे, दळण आणणे अशी कामे करुन घेतली जात असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.काही अधिकारी खासगी गाडीने शासकीय कर्मचाऱ्यांकडून ही कामे करून घेतात. ही कामे करताना लाज वाटते. मात्र नाईलाज असतो. कारण अधिकारी नाराज झाल्यास कसुरी रिपोर्ट पाठविणे, दंड आकारणे, सेवा पुस्तिकेत (सीआर) चुकीचा शेरा खराब लिहिणे आदी कारवाईला सामोरे जावे लागते. उपरोक्त वागणुकीचा ऊहापोह पोलीस कर्मचाऱ्यांनी पत्राद्वारे महासंचालकांकडे केला आहे. (प्रतिनिधी)‘कन्व्हिक्शन रेट’वरून छळ?न्यायालयात दाखल खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण (कन्व्हिक्शन रेट) वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्यातून गुन्ह्यांची कागदपत्रे पोलीस उपअधीक्षक, अपर अधीक्षक, सरकारी वकील, सहायक संचालकांकडे पाठविली जातात. त्यांनी काढलेल्या त्रुटींची पूर्तता करावी लागते. यात पोलीस अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो व त्यातूनच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते.