शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची छाया गडद!

By admin | Updated: July 14, 2014 02:58 IST

कोरडा गेलेला संपूर्ण जून महिना आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने दगा दिल्याने राज्यावरील दुष्काळाचीछाया आणखी गडद झाली आहे

पुणे : कोरडा गेलेला संपूर्ण जून महिना आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने दगा दिल्याने राज्यावरील दुष्काळाचीछाया आणखी गडद झाली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ६६ टक्के कमी पाऊस झाला आहे. धरणे आणि जलाशयांमधील पाणीसाठा टक्केवारीच्या बाबतीत एक अंकी झाला आहे. ही आकडेवारी चिंता वाढविणारी असल्याचे सरकारच्या वतीनेही सूचित केले जात आहे. आधीच्या तुलनेत गेल्या आठवड्यापासून राज्यात दमदार सरींची हजेरी लागली असली तरी महिन्याचा अनुशेष भरून निघणे अवघडच दिसत आहे.राज्यात जून महिन्यात सरासरीच्या ४१ टक्के कमी पाऊस झाला होता. ती तीव्रता या महिन्यात आणखी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडला असून, तो सरासरीच्या ७० टक्के कमी आहे. त्यापाठोपाठ विदर्भात सरासरीपेक्षा ६७ टक्के कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात ६३ टक्के कमी पाऊस झाला आहे. कोकणात मात्र गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत असल्याने तेथील दुष्काळाची तीव्रता थोडी कमी झाली आहे. मात्र अजूनही तेथे सरासरीच्या ५९ टक्के कमी पाऊस आहे.जून महिन्यात कमी पाऊस झाल्याने राज्यातील जलाशयांनी तळ गाठला आहे. विविध धरणांमधील पाणी संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भूमी कोरडी झाल्याने पडणारे पावसाचे पाणी जमिनीमध्येच मुरत आहे. त्यामुळे अजूनही धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत नसल्याचे चित्र राज्यभर आहे. आतापर्यंत नंदूरबार जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. तेथे सरासरीच्या ९५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा ८४% पाऊस कमी झाला आहे.राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळाचे सावट आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यास वीजनिर्मितीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. सातारा जिल्ह्याची परिस्थिती गंभीर असून, त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आठ कोटी देण्यात येतील, असे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)