शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
2
कीपॅड मोबाईल, ओटीपी नाही, युपीआय नाही, तरीही पैसे गायब; गिरणी कामगाराचे ७ लाख सायबर चोरट्याकडून लंपास
3
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
4
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
5
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
6
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
7
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
8
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
9
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
10
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
11
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
12
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
13
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
14
india Israel: कॅमेरा लावलेली गोळी पोटात गेल्यावर काय होते? कुठून आल्या कल्पना?
15
Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा
16
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
17
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
18
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
19
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
20
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
Daily Top 2Weekly Top 5

दप्तराचे वजन कमी होण्याची हमी नाही

By admin | Updated: July 2, 2015 01:10 IST

दप्तराचे ओझे कमी करणार असल्याचा दावा राज्य शासनाने केला असला तरी दप्तराचे नेमके किती वजन कमी होणार याचा खुलासा शासनाने केलेला नाही, असा आरोप करणारे प्रत्युत्तर

मुंबई : दप्तराचे ओझे कमी करणार असल्याचा दावा राज्य शासनाने केला असला तरी दप्तराचे नेमके किती वजन कमी होणार याचा खुलासा शासनाने केलेला नाही, असा आरोप करणारे प्रत्युत्तर याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे. याची दखल घेत न्यायालयाने याचा स्पष्टीकरण देण्याचे आदेश शासनाला दिले व ही सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली.चेंबूर येथील पाटील यांनी अ‍ॅड. नितेश नेवसे यांच्यामार्फत ही याचिका करण्यात आली आहे. याचे प्रत्युत्तर सादर करताना शासनाने प्राथमिक शिक्षण संचालक यांच्या अध्यक्षततेखाली यासाठी समिती नेमली असून इयत्ता पहिले ते पाचवीपर्यंतचे काही विषय कमी केले जाणार असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. ही समिती गेल्या वर्षी स्थापन करण्यात आली आहे़ इयत्ता पहिली व दुसरी तसेच तिसरी व पाचवी अशी विभागणी करून यातील काही विषय कमी केले जाणार आहेत़ विषय कमी झाल्याने दप्तराचे ओझे कमी होईल़ चित्रकला व संगणक विषयाची वही शाळेत ठेवावी तसेच विद्यार्थ्यांना वह्या ठेवण्यासाठी लॉकर द्यावे, अशी सूचनाही शाळांना करण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे, मात्र हे प्रतिज्ञापत्र दिशाभूल करणारे आहे. ही याचिका दहावीपर्यंतच्या दप्तरासाठी आहे. आणि सरकारने केवळ पाचवीपर्यंतच्या दप्तराचा खुलासा केला आहे. तसेच ही याचिका जानेवारीमध्ये दाखल झाली आहे. आता शाळा सुरू झाल्या आहेत. अद्याप दप्तराचे वजन नेमके कसे कमी होईल, याचे स्पष्टीकरण शासनाने दिले नसल्याचा आरोप पाटील यांनी प्रत्युत्तरात केला आहे. न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने पाटील यांच्या प्रत्युत्तराची दखल घेत याचा खुलासा करण्याचे निर्देश शासनाला दिले व ही सुनावणी तहकूब केली.