शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीच्या आमदाराला कारावास

By admin | Updated: December 3, 2015 00:40 IST

उपविभागीय अधिकाऱ्याला धमकावणे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दापोलीतील आमदार संजय वसंत कदम यांच्यासह ६ जणांना खेड येथील दिवाणी न्यायाधीश एस. आर. पाटील

खेड (रत्नागिरी) : उपविभागीय अधिकाऱ्याला धमकावणे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दापोलीतील आमदार संजय वसंत कदम यांच्यासह ६ जणांना खेड येथील दिवाणी न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.चिंचघर प्रभूवाडीतील नुकसानीसंदर्भात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार व तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य संजय कदम हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत २९ जुलै २००५ रोजी सकाळी खेड येथील तहसीलदार कार्यालयात आले. तेथील लिपिक संध्या बांदिवडेकर यांना या नुकसानीचे पंचनामे का केले नाहीत, असा जाब विचारला. यावेळी तत्कालीन उपविभागीय अधिकारी प्रवीण गेडाम यांनी हस्तक्षेप करीत, कर्मचारी अपुरे आहेत तरीही २४ तास काम करीत आहोत. ज्या कोणाचे नुकसान झाले असेल, त्यांना माझ्याकडे घेऊन या, असे कदम यांना सांगितले. त्यानंतर कदम यांनी तेथील खुर्ची उचलली व ‘येथून चालते व्हा आणि खेडमध्ये पुन्हा पाऊल टाकू नका,’ असे गेडाम यांना बजावले. त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी खुर्ची व टेबल उचलून तोडले, खुर्च्यांची फेकाफेक केली़ या प्रकारामुळे प्रवीण गेडाम घाबरले आणि पोलीस स्थानकात गेले. तत्कालीन नायब तहसीलदार मोहन गेजगे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संजय वसंत कदम (चिंचघर) यांच्यासह प्रकाश गोपाळ मोरे (कोरेगाव), सुषमा विश्वास कदम (हुंबरी), नामदेव बा. शेलार (सध्या भरणे), विजय भिकाजी जाधव (तळे), हरिश्चंद्र लक्ष्मण कडू (चिंचघर) या कार्यकर्त्यांविरोधात खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांना प्रत्येकी १ वर्षाचा कारावास आणि २१ हजारांचा दंड ठोठावला. दोन महिला फितूर : या खटल्यात विशेष म्हणजे तत्कालीन तहसीलदार कार्यालयातील दोघा महिला कर्मचारी यांनी खोटी साक्ष दिली होती. त्यांना फितूर घोषित करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांच्याबाबतचा अहवाल मागविला आहे.पंचनामे तातडीने होऊन गरजूंना नुकसानभरपाई मिळण्याबाबत मी त्यावेळी अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. न्यायालयाचा मी आदर करतो़ मी आता जिल्हा सत्र न्यायालयात अपिल करणार आहे.- संजय कदम, आमदार