शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

दप्तराला एक दिवसासाठी बाय!

By admin | Updated: February 17, 2015 01:39 IST

खासगी इंग्रजी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी कुठेही मागे पडू नयेत, यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत.

साईनाथ कुचनकार ल्ल चंद्रपूरजिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रघात निर्माण झाला असताना खासगी इंग्रजी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी कुठेही मागे पडू नयेत, यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता शिवजयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत ‘एकच ध्यास करू अभ्यास’ हे ५५ दिवसांचे विशेष अभियान शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत २५ फेब्रुवारीला राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांचे विद्यार्थी दप्तराविना जातील.१९ फेब्रुवारीला शिवजयंती तर १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. या कालावधीत अनेक महापुरुषांची जयंती आहे. राज्यातील या महापुरुषांनी राज्याच्या उत्कर्षाची, उन्नतीची, विकासाची स्वप्ने पाहिली आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची राज्यातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. महापुरुषांच्या जयंतीनिमित्तजिल्हा परिषद शाळांत गुणवत्तेवर आधारित एक रचनात्मक कार्यक्रम आयोजित करून या महापुरुषांना वंदन करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाने एक पत्रक काढले आहे. ५५ दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, २५ फेब्रुवारीला दप्तराविना शाळा सुरू राहणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांत भाषिक कौशल्ये विकसित केली जाणार असून, कृती कौशल्याच्या विकासासाठी अध्ययन शाळांतून दिले जाणार आहे. यात रंगीत कागदाच्या वस्तू तयार करणे, मातीच्या वस्तू, रांगोळी, मुक्तचित्र काढून घेण्यात येणार असून, क्रीडा तसेच गाणे म्हणण्याला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.सदर अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांसह पालक, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची राहणार आहे.च्प्रत्येक गावात आनंददायी वातावरण निर्माण व्हावे यासाठी राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील २ कोटी विद्यार्थी ५ मार्च रोजी एकाच दिवशी सकाळी १० वाजता ५ राष्ट्रभक्तीपर गीते गाणार आहेत. यातून वातावरणनिर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाचे गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.