शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बेदरकार ट्रकचालकाने दोघांना चिरडले !

By admin | Updated: January 7, 2016 02:11 IST

शहराजवळच्या संगममाहुली पुलावर बुधवारी दुपारी बेदरकार ट्रकचालकाने तीन वाहनांना दिलेल्या धडकेत बालिकेसह दोनजणांचा जागीच मृत्यू झाला

सातारा : शहराजवळच्या संगममाहुली पुलावर बुधवारी दुपारी बेदरकार ट्रकचालकाने तीन वाहनांना दिलेल्या धडकेत बालिकेसह दोनजणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहाजण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.मधुरा धमेंद्र शिर्के (३) आणि संतोष अशोक चव्हाण (३८) अशी मृतांची नावे असून प्रकाश बाबूराव चव्हाण (६९) आणि तानाजी प्रकाश पवार (३५) हे गंभीर जखमी झाले आहेत. लोखंड भरलेला एक ट्रक साताऱ्याहून कोरेगावकडे निघाला होता. दुपारी साडेचारच्या सुमारास संगममाहुली पुलाजवळील वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. याचवेळी समोरून कोरेगाव-सातारा एसटी येत होती. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याचे ध्यानी येताच एसटी चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही ट्रकने एसटीच्या उजव्या बाजूला जारेदार धडक दिली. रस्त्याकडेला असलेल्या दिशादर्शक खांबाला अडकल्याने एसटी पुलाच्या भरावावरून सुदैवाने कोसळली नाही.एसटीला धडक दिल्यानंतर ट्रक तसाच पुढे गेला आणि समोरून येणाऱ्या संतोष चव्हाण यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. खटावहून साताऱ्याकडे येत असलेल्या कारलाही ट्रकने धडक दिली. यात कारमधील मधुरा शिर्के हिचाही जागीच मृत्यू झाला तर इतर सहाजण जखमी झाले. (प्रतिनिधी)