शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांनी ओलांडली धोकादायक पातळी

By admin | Updated: August 3, 2016 02:46 IST

महाबळेश्वरच्या पायथ्याशीच असणाऱ्या पोलादपूर येथे २५६ मिमी तर महाड येथे २३० मिमी अशा विक्रमी पावसाची नोंद झाली

अलिबाग : गेल्या चोवीस तासांत महाबळेश्वरमध्ये ३१९ मिमी तर महाबळेश्वरच्या पायथ्याशीच असणाऱ्या पोलादपूर येथे २५६ मिमी तर महाड येथे २३० मिमी अशा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये उगम पावणाऱ्या सावित्री नदीने महाडमध्ये धोकादायक जलपातळी ओलांडून पुराचे पाणी महाड बाजारपेठ व परिसरात घुसले आहे. महाबळेश्वरसह पोलादपूर व महाडमध्ये संततधार सुरूच असल्याने सावित्री नदीची जलपातळी सातत्याने वाढत आहे. नदीची धोकादायक पूर पातळी ६.५० मीटर असून सद्यस्थितीत जलपातळी ६.५० मीटर इतकी झाली आहे. मंगळवारी अमावस्या असून समुद्रास पूर्ण भरती ११.१५ वाजता होती. त्यामुळे पश्चिम वाहिनी नद्यांच्या पुराच्या पाण्याचा निचरा समुद्राकडे वेगाने होत नव्हता. ओहोटी सुरु झाल्यावर नद्यांची जलपातळी कमी येवू शकेल, असा अंदाज महाड-पोलादपूरच्या पूर्वीच्या एमएमएचे उपाध्यक्ष विनोद देशमुख यांनी व्यक्त केला आहे.महाडमधील सावित्री नदीबरोबरच जिल्ह्यातील उर्वरित नद्यांच्या जलपातळीत देखील विक्रमी वाढ झाली आहे. अंबा नदीची नागोठणे येथे जलपातळी ६ मीटर (धोकादायक पूर पातळी ९ मी.) झाली आहे. कुंडलिका नदीची डोलवहाळ येथे जलपातळी २३ मीटर (धोकादायक पूर पातळी २३.९५मी.) झाली आहे. पाताळगंगा नदीची लोहोप येथे जलपातळी १८.९२ मीटर (धोकादायक पूर पातळी २१.५२मी.) झाली आहे. उल्हास नदीची कर्जत येथे जलपातळी ४३ मीटर (धोकादायक पूर पातळी ४८.७७मी.) झाली आहे. गाढी नदीची पनवेल येथे जलपातळी ३ मीटर (धोकादायक पूर पातळी ६.५५मी.) झाली आहे. भिरा धरणाचे तीन दरवाजे ०.२५ सेंमी उघडले, ८३.२० क्युसेक्स जल विसर्ग सुरू झाला आहे. भिरा धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १४९.४० मिमी पाऊस झाला तर यंदाच्या पावसाळ््यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत येथे एकूण २८४२.२० मिमी पाऊस झाल्याने भिरा पिकअप धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातील जलपातळी धोक्याच्या खाली राखण्याकरिता धरणाचे तीनही दरवाजे ०.२५ सेमी उघडण्यात आले असून त्यातून सद्यस्थितीत ८३.२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. जलविसर्गामुळे कुंडलिका नदीच्या जलपातळीत वाढ झाली आहे. परिणामी रोहा अष्टमी पुलास कुंडलिका नदीचे पाणी पोहोचले आहे. रायगड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती नियंत्रणाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)>जिल्ह्यात पर्जन्यमानमुरु ड-१२२ मि.मी., अलिबाग-६३ मि.मी. पेण-६४ मि.मी., पनवेल४३.२० मि.मी., उरण-३२ मि.मी., कर्जत-९६.८० मि.मी., खालापूर-७४ मि.मी., माणगांव-१९४ मि.मी., रोहा-१४२ मि.मी., सुधागड पाली-१२९ मि.मी., तळा-१४० मि.मी., महाड-२३० मि.मी., पोलादपूर-२५६ मि.मी., म्हसळा-१८१.६० मि.मी., श्रीवर्धन-१३३ मि.मी., माथेरान-४३ मि.मी. जिल्ह्यात एकूण १९४३.६०मि.मी.पाऊस पडला असून हे सरासरी पर्जन्यमान १२१.४८ मि.मी. आहे.>महाड बाजारपेठेतही पुराचे पाणीमहाड : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, काळ, गांधारी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नद्यांचे पाणी सोमवारी शहरात शिरल्याने सखल भाग पाण्याखाली होता. दस्तुरी नाका मार्ग, क्रांतिस्तंभ परिसर, अर्जना भोई मार्ग, मुख्य बाजारपेठ, गाडीतळ, बंदरनाका या ठिकाणी पुराचे पाणी दिवसभर होते. मुख्य बाजारपेठेतील भगवानदास बेकरी ते विठ्ठल मंदिरापर्यंतच्या मार्गावर सुमारे दोन ते तीन फूट पुराचे पाणी होते. तर दस्तुरी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शहराकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. >पोलादपूरमध्ये दरड कोसळून एक ठारपोलादपूर : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ अतिवृष्टीमुळे घरावर दरड कोसळून उदय मारु ती चिकणे (५०) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. घरातील अन्य व्यक्ती बाहेर गेल्याने बचावल्या. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. तुर्भे विभागातील वझरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल खचल्याने त्या विभागातील सात वाड्यांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. या रस्त्याची बांधकाम उपविभागातील उपअभियंता सदानंद शिर्के, जे.इ. जगताप यांनी पाहणी केली.आंबेनळी घाटातील दरड रस्त्यावर आली असली तरी वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. कुडपन रस्त्यावर दरड आल्याने वस्तीची एसटी अडकून पडली. दरड हटविण्याचे काम चालू असून लवकरच रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती बांधकाम विभागाने दिली.सवाद गावात सावित्री नदीचे पाणी काही घरांमध्ये शिरले. काटेतळी, कापडेखुर्द येथे वाड्या, घरांचे नुकसान झाले आहे. पितळवाडी बोरज फाटा दरम्यान बांधण्यात आलेल्या पुलाला भेगा पडल्याची अफवा पसरल्याने हा पूल बंद करण्यात आला होता.