शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील थांबे ठरताहेत धोकादायक

By admin | Updated: April 27, 2016 01:58 IST

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वलवण गावाच्या हद्दीतील बसथांबे मृत्यूचे सापळे बनले आहेत.

लोणावळा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वलवण गावाच्या हद्दीतील बसथांबे मृत्यूचे सापळे बनले आहेत. हे थांबे तातडीने बंद करा, अशी मागणी नागरिक करत आहेत. सोमवारी या ठिकाणी बसने धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जायबंदी झाला. यापूर्वीदेखील या ठिकाणांवर चार ते पाच प्राणांतिक अपघात झाले असून, किरकोळ अपघात कायम होत असतात. असे हे धोकादायक थांबे तातडीने बंद न केल्यास या ठिकाणांवर आंदोलन करण्यात येणार आहे. मुळातच राष्ट्रीय महामार्ग अरुंद मार्ग असलेल्या वलवण गावात दोन खासगी हॉटेलांना महाराष्ट्र परिवहन विभागाचे अधिकारी व संबंधित मंडळींनी आर्थिक लागेबांध्यावर काही बस थांबवण्याची परवानगी दिली आहे. वास्तवात मात्र लोणावळा शहरातील अधिकृत बसस्थानकात थांबत नाहीत. एवढ्या बस या थांब्यावर थांबतात. यातील काही अधिकृत तर काही अनधिकृत असतात. या बदल्यात हॉटेलचालकांकडून एसटीचे चालक व वाहक यांना फुकट जेवण, मिनिरल वॉटर व पैसे दिले जात असल्याची नागरिकांची ओरड आहे. तर लोणावळा महाविद्यालयासमोरील एका खासगी बसचे हॉटेल आहे. दिवस-रात्र या ठिकाणी बसेसची वर्दळ सुरू असते. अतिशय धोकादायक पद्धतीने बसचे चालक या ठिकाणांवर बस आत-बाहेर करतात. यामुळे येथे सातत्याने अपघात घडत आहेत. द्रुतगती महामार्गाचे मुख्य सर्कल, लोणावळा महाविद्यालय याच भागात आहे. तसेच ग्रामीण भागातून शहरात जाताना याच मार्गावरून नागरिकांना दुचाकीवरून ये-जाकरावी लागत असल्याने हा संपूर्ण परिसर वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.(वार्ताहर)