शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरच्या पालिका शाळेत गटारीचा झिंगाट

By admin | Updated: August 2, 2016 02:16 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या माशाचापाडा शाळेत रविवारी डीजेच्या तालावर गटारीची जंगी पार्टी झोडण्यात आल्याची घटना उघडकीस आली

भार्इंदर : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सात कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या हजेरी शेडमध्ये आॅन ड्युटी ‘गटारी’ केल्याची बातमी ताजी असतानाच मीरा-भार्इंदर महापालिकेच्या माशाचापाडा शाळेत रविवारी डीजेच्या तालावर गटारीची जंगी पार्टी झोडण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. भाजपा नगरसेवक व प्रभाग समिती-६ चे सभापती अनिल भोसले यांच्या पुढाकाराने ही पार्टी झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. मात्र, त्याची चौकशी सुरू असल्याचे आयुक्त अच्युत हांगे यांनी सांगितले.भोसले यांनी आपल्या समर्थकांना खूश करण्यासाठी रविवारी काशीगावच्या माशाचापाडा येथील पालिका शाळेत गटारीचा बेत आखला होता. रविवारी शाळा बंद असल्याने त्याची चावी परिसरातच राहणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांकडे देण्यात आली होती. ती आणण्यासाठी भोसले यांनी काही तरुणांना त्यांच्याकडे पाठवले. परंतु, ते घरी नसल्याने त्यांच्या पत्नीने चावी देण्यास नकार दिला. अखेर, भोसले यांनी आपल्या सभापतीपदाचा वापर करीत चावी मिळवली. त्यानंतर, दुपारी ३ वाजल्यापासून शाळेच्या आवारात डीजेच्या तालावर गटारीचा झिंगाट सुरू झाला. मद्यपींनी जेवणखाण झाल्यानंतर शाळेच्याच परिसरात उष्टे-खरकटे टाकले. तसेच साफसफाईही केली. याविरोधात शाळेतील काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रारही करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. या गटारीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याचे भान मात्र भोसले व त्यांच्या समर्थकांना राहिले नाही. या संतापजनक प्रकाराला पालिकेचे शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख यांनी दुजोरा दिला आहे. आयुक्त हांगे यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत देशमुख यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)।आपल्याकडे या प्रकरणी कोणीही तक्रार केलेली नाही. शिवाय, तशी नोंदही नसल्याने कारवाई झाली नाही. - विलास सानप, वरिष्ठ निरीक्षक, काशिमीरा पोलीस ठाणे