शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा शेतमजूरावर हल्ला

By admin | Updated: April 8, 2017 01:36 IST

वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथे पहाटे शेतमजूर झोपेत असताना बिबट्याने हल्ला केला

कोरेगाव भीमा : वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथे पहाटे शेतमजूर झोपेत असताना बिबट्याने हल्ला केला. त्याच्या पायाला तोंडात पकडून ओढत नेल्याने शेतमजूर जखमी झाला. प्रतिकार केल्याने बिबट्या पळून गेला. मात्र तेथून जाताना बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला.वनपाल बी. आर. ओव्हाळ मात्र न पाहताच हल्ला करणारा बिबट्या नव्हे तरस असल्याचा जावईशोध लावायला विसरले नाहीत. येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष कुंडलीकअप्पा भंडारे यांच्या शेतावर भगवान साठे (वय ४०) हे काम करीत आहेत. साठे हे रात्री आपटी रस्त्यावरील भंडारे यांच्या वीटभट्टीसमोर झोपले होते. पहाटे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पायाला धरून ओढत असताना साठे यांनी आरडाओरड करीत बिबट्याचा प्रतिकार केला. त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला.जखमी साठे यांना प्रथमोपचारासाठी केईएम रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यास प्रतिबंधक लसीकरण व पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. साठे यांची प्रकृती आता स्थिर आहे.ग्रामस्थ धास्तावलेगेली तीन ते चार महिन्यांपासून बिबट्याने कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, वढु बुद्रुक, आपटी या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुमाकुळ घातला आहे. वनविभागास पत्रव्यवहार केल्यानंतर चार-पाच दिवसांनी पिंजरा लावण्यापलीकडे कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाहीत. आजपर्यंत बिबट्याने शेळी, घोड्याचे पिल्लू , कालवड, कुत्र्यांचा फडशा पाडल्याचा प्रकार घडला होता. आता बिबट्याने थेट माणसांवरच हल्ला केल्याने येथील ग्रामस्थ धास्तावले आहेत. पिंजरा लावून बिबट्या पकडण्याची मागणी सोसायटीचे माजी अध्यक्ष कुंडलीक भंडारे यांनी केली आहे.‘तो’ दिसल्यास फटाके कसे वाजवायचे तुम्हीच दाखवा बिबट्या समोर दिसल्यावर साक्षात मृत्यू समोर असताना वनपाल नागरिकांना फटाके वाजवण्याचा सल्ला देतात. बिबट्याच्या समोर फटाके कसे वाजवायचे, याचे प्रात्यक्षिक वनपालांनीच दाखवावे, असा सावल होत असून फटाके काय खिशात घेऊनच कायम फिरायचे का? अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली़