शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दंडुका न उगारताही लाखोंचा मोर्चा शांततेत

By admin | Updated: October 17, 2016 04:14 IST

एक मराठा, लाख मराठा... असे फलक घेऊन तीनहातनाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडकलेला मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेने पार पडला

ठाणे : एक मराठा, लाख मराठा... असे फलक घेऊन तीनहातनाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडकलेला मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेने पार पडला. मोर्चात कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा घोषणाबाजी नसल्याने पोलिसांनाही कुठेही ‘दंडुकेबाजी’ करावी लागली नाही. त्यामुळे कॉन्स्टेबलपासून ते पोलीस आयुक्तांपर्यंत सर्व पोलिसांनी या मोर्चाचे कौतुक केले.तीनहातनाक्यावर कोपरी, माजिवडा, मुलुंड चेकनाका आणि नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, शहापूर आणि पालघर जिल्ह्यातील मराठाबांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तीनहातनाक्यापासून सुरु झालेल्या या मोर्चामध्ये सुरुवातीला विद्यार्थिनी, महिला त्यापाठोपाठ पुरुष मंडळी सहभागी झाले होते.या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त पराग मणेरे, वागळे इस्टेट विभागाचे उपायुक्त सुनील लोखंडे आणि ठाण्याचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्यासह ३०० अधिकारी आणि दोन हजार पोलीस तसेच राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्यांची जादा कुमकही तैनात करण्यात आलेली होती. (प्रतिनिधी)>पोलीस-छायाचित्रकार यांच्यात किरकोळ वादतीनहातनाक्यावरील उड्डाणपुलावरून मोर्चाचे छायाचित्रण करण्यासाठी काही छायाचित्रकारांनी पुलाच्या कठड्यावर चढण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी एखादी दुर्घटना होऊ नये, यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित भुजबळ यांनी त्यांना अटकाव केला. यातूनच छायाचित्रकार आणि पोलिसांत किरकोळ वादाचा प्रकार घडला. निरीक्षक मांगले यांनी हा वाद सोडवला. मोर्चानंतर घरी परतणारे मराठाबांधव अत्यंत शिस्तीने आल्या मार्गाने परतत होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू होती.