शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दंडुका न उगारताही लाखोंचा मोर्चा शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 20:02 IST

एक मराठा लाख मराठा, असे फलक घेऊन तीन हात नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत धडकलेला मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेने पार पडला.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 16 - एक मराठा लाख मराठा, असे फलक घेऊन तीन हात नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत धडकलेला मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेने पार पडला. मोर्चात कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा घोषणाबाजी नसल्याने पोलिसांनाही कुठेही दंडूकेबाजी करावी लागली नाही. त्यामुळे कॉन्स्टेबल पासून ते पोलीस आयुक्तांर्पयत सर्व पोलिसांनी या मोर्चाचे कौतुक केले.तीन हात नाक्यावर कोपरी, माजीवडा, मुलूंड चेक नाका आणि नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, शहापूर आणि पालघर जिल्हयातील मराठा बांधव मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. तीन हात नाक्यापासून सकाळी 11 वा. सुरुवात झालेल्या या मोर्चामध्ये सुरुवातीला विद्यार्थीनी, महिला त्यापाठोपाठ पुरुष मंडळी सहभागी झाले होते. कोपर्डी घटनेतील आरोपींना सहा महिन्यात फाशी देण्यात यावी आणि मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे आदी मागण्यांचे फलक आणि भगवे ङोंडे फडकवित हा मुक मोर्चा निघाला होता. या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त पराग मणोरे, वागळे इस्टेट विभागाचे उपायुक्त सुनिल लोखंडे आणि ठाण्याचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्यासह 3क्क् अधिकारी आणि दोन हजार तसेच राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्यांची जादा कुमकही तैनात करण्यात आलेली होती. मोर्चामध्ये घोषणाबाजी नसल्याने आणि कोणीही चिथावणीखोर भाषणबाजी करीत नसल्याने या मोर्चाच्या बंदोबस्ताचा तशा अर्थाने ताण वाटला नाही, असे एका अधिका:याने सांगितले. तर मोर्चाच्या शिस्तीबद्दल सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनीही कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांचे कौतुक केले. पोलिसांच्या मदतीला सुमारे तीन हजार स्वयंसेवक उत्स्फुर्तपणो सहभागी झाले होते. मोर्चाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तीन हात नाका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारे काही मार्ग वाहनांसाठी सकाळी 1क् ते दुपारी 3 वा. र्पयत बंद ठेवण्यात आले होते. नितिन कंपनी ते तीन हा नाक्याकडे जाणारा उड्डाणपूलाचा मार्ग खुला ठेवण्यात आला होता. तीन हात नाका ते गोखले रोड, मॉडेला चेक नाका ते तीन हात नाका, तीन हात नाका ते कोपरी आणि हरिनिवास ते तीन हात नाका हे मार्गही बंद ठेवण्यात आले होते. वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस उपायुक्त संदीप पालवे, सहायक पोलीस आयुक्त बी. आर. गीते, पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्यासह 51 अधिकारी आणि 370 कर्मचारी कार्यरत होते..............अधिकारी पत्रकार यांच्यात किरकोळ वादतीन हात नाक्यावरील उड्डाणपूलावरुन मोर्चाचे छायाचित्रण करण्यासाठी काही छायाचित्रकार पूलाच्या कठडयावर चढण्याचा प्रय} करीत होते. त्याठिकाणी एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित भुजबळ यांनी त्यांना अटकाव केला. यातूनच पत्रकार आणि त्यांच्यात किरकोळ वादाचा प्रकार घडला. निरीक्षक मांगले यांनी हा वाद सोडविला. मोर्चानंतर घरी परतणारे मराठा बांधव अत्यंत शिस्तीने आल्या मार्गाने परतत होते. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणारे मार्ग मोर्चानंतर अवघ्या दीड ते दोन तासातच रिकामे झाले आणि वाहतूकही सुरुळीत सुरु झाली.